Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 1,744 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Webdunia
शनिवार, 23 ऑक्टोबर 2021 (08:59 IST)
राज्यात कोरोना बाधितांच्या   दैनंदिन रुग्णसंख्येत  घट होत आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची (Recover Patient) संख्या देखील आज वाढली आहे. याबरोबरच दैनंदिन मृत्यूची संख्या देखील घटली आहे. मगील काही दिवसांपासून राज्यातील दैनंदिन कोरोना  रुग्णांची संख्या दीड हजाराच्या आसपास स्थिरावली आहे. राज्यात शुक्रवारी  1 हजार 632 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तसेच 1 हजार 744 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

राज्यात आतापर्यंत 64 लाख 32 लाख 138 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण  97.46 टक्के आहे. तसेच आज दिवसभरात 40 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत राज्यात 1 लाख 39 हजार 138 जणांचा  उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.12 टक्के इतका झाला आहे.
सध्या राज्यात 24 हजार 138 रुग्णांवर उपचार सुरु (Active patient) आहेत. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 16 लाख 299 हजार प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65 लाख 99 हजार 850 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 1 लाख 98 हजार 958 लोक होम क्वारंटाईन (home quarantine) आहेत तर 988 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये  आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

महायुती175 हून अधिक जागा जिंकणार अजित पवारांचा दावा

मुंबईत तरुणीला ओलिस ठेवून तरुणाने केला बलात्कार,पीडितेचा प्रायव्हेट पार्ट जाळला

महाराष्ट्रात ड्राय डे, या महिन्यात 5 दिवस दारूविक्री होणार नाही

काँग्रेसची मोठी कारवाई, 28 बंडखोर उमेदवार निलंबित

धर्म धोक्यात नव्हे पक्ष धोक्यात म्हणत रितेश देशमुख यांची राज्य सरकारवर टिका

पुढील लेख
Show comments