Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दिलासादायक ! 40 हजारांहून कमी रुग्ण; 61,607 जणांना डिस्चार्ज

Webdunia
मंगळवार, 11 मे 2021 (08:14 IST)
राज्यात संसर्गाचा वेग मंदावत असून बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. राज्यात सोमवारी  37 हजार 236 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 61 हजार 607 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सलग दुसऱ्या दिवशी राज्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या नव्या रुग्णापेक्षा अधिक आहे.
 
आरोग्य विभागाच्या हवाल्याने एएनआयने याबाबत आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 51 लाख 38 हजार 973 झाली असून, त्यापैकी 44 लाख 69 हजार 425 जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट सध्या 86.97 टक्क्यांवर पोहोचला आहे.
 
सध्या राज्यात 5 लाख 90 हजार 818 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सोमवारी 549 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, आजवर एकूण 76 हजार 398 जण मुत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.48 टक्के एवढा आहे.
 
सध्या राज्यात 36 लाख 70 हजार 320 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 26 हजार 664 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आतापर्यंत 2 कोटी 96 लाख 31 हजार 127 नमूने तपासण्यात आले आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कोणत्या पिकाला वाढायला १ वर्ष लागते? Late-arriving crop

तुमचे पालक जर ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे असतील, तर या वैद्यकीय चाचण्या नक्की करून घ्या...

'मनुवाद' आणि 'ब्राह्मणवाद' म्हणजे काय? जाणून घ्या इतिहास, गैरसमज आणि संपूर्ण सत्य

August Month 2026 Horoscope ऑगस्ट मासिक राशीभविष्य

पाऊस पडला तरी मेकअप वाहून जाणार नाही! वापरा या सोप्या 'मान्सून मेकअप ट्रिक्स'

सर्व पहा

नवीन

कोणत्या पिकाला वाढायला १ वर्ष लागते? Late-arriving crop

मुख्यमंत्री फडणवीस यांचे नवीन कार्यालय आता मुंबईच्या प्रतिष्ठित एअर इंडिया बिल्डिंगमध्ये असणार

नोंदणीशिवाय चालणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या कॅन्टीन आणि व्यवसायावर एफडीएची कारवाई

LIVE: मुख्यमंत्री फडणवीस यांची जागतिक दर्जाचे संमेलन केंद्र उभारण्याची मोठी घोषणा

iPhone 18 Pro च्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता; किंमत ₹१.५ लाखांपासून सुरू होणार का?

पुढील लेख
Show comments