Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोरोना बेभान ! 24 तासांत 93,249 नवीन प्रकरणे आली, 513 मृत्युमुखी

Corona Bevan! In 24 hours there were 93
, रविवार, 4 एप्रिल 2021 (12:36 IST)
भारतातील कोरोना केसेसची नवीन प्रकरणे देशात दररोज नवीन विक्रम नोंदवित आहेत. देशातील कोरोना संसर्गाच्या झपाट्याने होणाऱ्या वाढीचा अंदाज यावरून काढला जाऊ शकतो की आता एकाच दिवसात 90 हजाराहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. पुन्हा कोरोनाचा सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रात झाला आहे . महाराष्ट्रात एकाच दिवसात कोरोनाचे 49,447 नवीन रुग्ण आढळले. त्याच बरोबर, आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशभरात 24 तासांत 93,249 नवीन प्रकरणे आली तर 513 लोक मृत्युमुखी झाले आहे.नवीन रूग्ण आल्यानंतर देशात संक्रमित रूग्णांची एकूण संख्या एक कोटी 24 लाख 85 हजार 509 झाली आहे.
शनिवारी महाराष्ट्रात कोविड चे  नवीन रुग्ण आढळले आहेत, जे आतापर्यंतच्या एकाच दिवसात सर्वाधिक नोंद झाले आहेत. यामुळे, राज्यात संक्रमित होण्याची एकूण संख्या 29,53,523 पर्यंत वाढली आहे तर 277 रुग्ण मृत्युमुखी झाले आहे. तर मृतांची संख्या 55,656 वर पोचली आहे. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार  मुंबई शहरात कोविड चे 9,108 नवीन रुग्ण आढळले आहे. जे एका दिवसात सर्वाधिक घटना आहे. यापूर्वी, 17 सप्टेंबर 2020 रोजी एकाच दिवसात सर्वाधिक 24,619 नवीन रुग्णांची नोंद महाराष्ट्रात झाली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यात कोरोनाचा उद्रेक ! ऑक्सिजन ,बेड च्या कमतरतेमुळे नवे संकट !