suvichar

कोरोनाची ऑनलाइन चाचणी शक्य

Webdunia
बुधवार, 1 एप्रिल 2020 (07:28 IST)
सध्या कोरोना टेस्ट किटची मागणी झपाट्याने वाढत असताना प्रॅक्टोने जाहीर केले आहे की कोविड -१९ ची चाचणी घेण्यासाठी आपण ऑनलाइन चाचणी बुक करू शकता. कंपनीने यासाठी थायरोकेअर सोबत भागीदारी केली आहे.
 
बंगळुरू स्थित या कंपनीने म्हटले आहे की, कोविड -१९ चाचणी थायरोकेयरच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात येत असून भारत सरकारकडून त्यास मान्यता देण्यात आली आहे. यासह इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात आयसीएमआरनेही त्याला मान्यता दिली आहे.
 
प्रॅक्टोने म्हटले आहे की, 'सध्या मुंबईकरांसाठी चाचणी ऑनलाईन उपलब्ध असून लवकरच ती संपूर्ण देशासाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी, डॉक्टरांनच्या वैध प्रिस्क्रिप्शनची आवश्यकता असेल आणि फिशियन्सची सही फॉर्म भरावा लागेल. चाचणी दरम्यान फोटो आयडी कार्ड देखील आवश्यक असेल.
 
कोविड -१९ ची चाचणी वेबसाईटवरुन बुक करता येऊ शकते. यासाठी ४५०० रुपये फी लागेल. बुकिंग केल्यानंतर, रक्ताचे नमुने गोळा करण्यासाठी प्रतिनिधींना घरी पाठवले जाईल.
 
नमुने संकलनासाठी पाठविलेले प्रतिनिधी आयसीएमआरने जारी केलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे अनुसरण करतील असे कंपनीने म्हटले आहे. चाचणीसाठी स्वॅब व्हायरल ट्रान्सपोर्ट माध्यमाद्वारे रक्त गोळा केले जाईल. कोविड -१९ चाचणीसाठी घेतलेलं रक्त थायरोकेअर प्रयोगशाळेत पाठविले जाईल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कुंभ राशीत शुक्राचे आगमन, या ५ राशींचे नशीब पालटणार, संपत्ती आणि रोमान्सचे योग!

हृदयविकाराच्या या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल प्रत्येक व्यक्तीला माहिती असायला हवी

Essay on Growing Population वाढती लोकसंख्या: एक गंभीर समस्या

विंड चाइम वाऱ्याच्या आवाजातून शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण करतात

अर्ध नारीश्वर अष्टकम Ardhanareeswara Ashtakam

सर्व पहा

नवीन

नाशिकमधील 18 हजार जन्म दाखले संशयास्पद; सोमय्या यांची चौकशीची मागणी

Vasudev Balwant Phadke वासुदेव बळवंत फडके: भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील पहिले सशस्त्र क्रांतिकारक

जेजे रुग्णालयातील 200 निवासी डॉक्टरांचे उपोषण, बेमुदत संपावर

LIVE: नाशिकमधील 18 हजार जन्म दाखले संशयास्पद

JEE Mains Result 2026 : एनटीएने जेईई मेन्स निकाल जाहीर केला, 12 विद्यार्थ्यांना 100 टक्के मिळाले

पुढील लेख
Show comments