suvichar
✕

कोरोनावर ९४ वर्षाच्या आजींची यशस्वी मात

Webdunia
कामेरी येथील ९४ वर्षाच्या आजींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. मिरज कोरोना रुग्णालयातुन करोनामुक्त ९४ वर्षीय आजीला डिस्चार्ज दिला आहे. यावेळी डॉक्टर आणि नर्स यांच्याकडून टाळ्या वाजवत शुभेच्छा देत डिस्चार्ज देण्यात आला.
 
सांगली जिल्ह्यातील कामेरी येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ९४ वर्षाच्या महिलेला कोरोनाची लागण झाली होती. त्यांना मिरजेतील आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले होते. या महिलेवर शासकीय रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेस आणि वैद्यकीय स्टाफकडून योग्य प्रकारे उपचार करण्यात आले. त्यांची काळजी घेण्यात आली. या सर्वांच्या प्रयत्नामुळे ९४ वर्षे कोरोनामुक्त झाल्या. आयसोलेशन कक्षात दाखल केल्यापासून १४ दिवसानंतर आजींची स्वाब टेस्ट घेण्यात आली. दोन टेस्ट मध्ये त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. या महिलेस रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यापूर्वी सुद्धा मिरजेतील कोरोनाच्या रुग्णालयात दोन वर्षाच्या कोरोना पॉझिटिव्ह बाळावरही यशस्वी उपचार करून त्यालाही कोरोनामुक्त करण्यात आले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

नवीन

१३ शिक्षकांच्या आत्महत्या, ४०० कोटी रुपयांची थकबाकी: पुणे प्रकरणाची CBI-ED मार्फत चौकशी करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

LIVE: महाराष्ट्रात राजकीय खळबळ, राष्ट्रवादी काँग्रेसच्या २० हून अधिक आमदारांमध्ये फुटीची शक्यता

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

Senapati Bapat Jayanti 2026 : सेनापती बापट जयंती

भारताचे तीन 'अ' संघ जाहीर, अनुष्का शर्मा टी-२० आणि एकदिवसीय संघांचे नेतृत्व करणार

पुढील लेख
Show comments