Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोरोनाचे नियम धाब्यावर बसवून सुरु होता लग्न सोहळा; मनपाची कारवाई

Webdunia
बुधवार, 26 मे 2021 (21:50 IST)
नवीन नाशिक भागात कोरोना नियम धाब्यावर बसवत सुरू असलेल्या लग्नसोहळ्यावर कारवाई करण्यात आली आहे,या कारवाईत वरपक्ष आणि वधूपक्ष यांच्या सोबतच उपस्थितांवरही दंडात्मक कार्यवाई करण्यात आली आहे..
 
प्रशासनाकडून मिळालेल्या माहिती नुसार कोव्हीड- १९ प्रतिबंधात्मक उपाय योजनेच्या अनुषंगाने घनकचरा व्यवस्थापन विभाग व पोलीस प्रशासन यांच्या मार्फत संयुक्तपणे नवीन नाशिक भागातील अश्विन नगर येथे कोणतीही परवानगी न घेता घरगुती विवाह समारंभ चालू होता. त्याचदरम्यान हा विवाह सोहळा सुरू असतांना सदर विवाहाच्या ठिकाणी मास्कचा वापर न केलेबाबत ३० नागरिकांना एकूण रु.१५०००,तसेच सोशल डिस्टन्स चे पालन न केलेबाबत वरपक्ष,  वधुपक्ष व केटरींग सर्व्हिसेसचे मालक यांचेवर  प्रत्येकी ५००० रुपये प्रमाणे एकूण १५,००० दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
 
अंबड पोलीस स्टेशनचे पीएसआय राकेश शेवाळे मनपाचे सिडको विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गांगुर्डे ,अधीक्षक दशरथ भवर, स्वच्छता निरीक्षक बी आर बागुल ,राजेश बोरीसा,आदींकडून ही कार्यवाई करण्यात आली आहे..

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

अमळनेरजवळ मालगाडी रुळावरून घसरली, नंदुरबार-सुरत रेल्वे मार्ग विस्कळीत

LIVE: परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी बसेस स्मार्ट केल्या जातील

पुण्यातील व्यावसायिकाला पाकिस्तानकडून धमकी

इंग्लंडविरुद्धच्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, भारताने पाकिस्तानच्या ताब्यातून जम्मू-काश्मीर परत घ्यावे

पुढील लेख
Show comments