Dharma Sangrah

करोना चाचणीच्या दरात ५० टक्क्यांनी कपात

Webdunia
शनिवार, 13 जून 2020 (17:00 IST)
राज्य सरकारनं करोना चाचणीच्या शुल्कासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यात करोना चाचणीच्या दरात ५० टक्क्यांनी कपात खासगी लॅबला दणका दिला आहे. दुसरीकडे सरकारच्या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळला आहे.
 
यासंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ‘पीटीआय’शी बोलताना सांगितले की, “खासगी लॅबमध्ये करण्यात येणाऱ्या करोना चाचणीच्या शुल्कात सरकारनं कपात केली आहे. हे शुल्क पूर्वी ४५०० रुपये इतके होते, ते आता २२०० रुपये घेतले जाईल. कमी कमी दर निश्चित केल्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळेल,” असं टोपे म्हणाले.
 
“व्हीटीएमच्या माध्यमातून हॉस्पिटलमधून स्वॅब घेतल्यास २२०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. तर घरी जाऊन स्वॅब घेतल्यास २८०० रुपये शुल्क असेल. पूर्वी हॉस्पिटलमधून स्वॅब ४५०० शुल्क आकारले जात होते. तर घरी जाऊन स्वॅब घेतल्यास ५२०० रुपये इतकं शुल्क रुग्णाला द्यावं लागत होतं,” असं टोपे यांनी सांगितलं. दरम्यान, आयसीएमआरने २५ मे रोजी सर्व राज्यांना पत्र पाठवून त्यांच्या राज्यात दर निश्चिती करण्यास परवानगी दिली होती. त्यानुसार कर्नाटक ने करोना चाचणीसाठी २२५० रुपये दर निश्चित केला तर तामिळनाडू ने २५०० रुपये व जम्मू- काश्मीर मध्ये २७०० रुपये दर निश्चित करण्यात आला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

खरे प्रेम आणि आकर्षण यात फरक कसा ओळखाल?

Career in Bachelor of Occupational Therapy BOT : बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

चेहऱ्यावर ब्लीच लावताना या चुका करणे टाळा, दुष्परिणाम होऊ शकतात

रात्री उशिरा जेवण करणाऱ्यांनी एकदा नक्की वाचा; शरीरावर होतात हे परिणाम

डिटॉक्स ड्रिंक की फक्त ट्रेंड? सकाळी काय प्यावे याबाबत डॉक्टरांचा सल्ला जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली

ट्रम्प यांचा यू-टर्न! अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध संपवण्याचे संकेत दिले

Ashok Kharat case "मग राजकारण्यांना बुरखा घालून फिरावे लागेल," मंत्री संजय शिरसाट म्हणाले.....

कतारच्या रास लफानवरील इराणी हल्ल्यामुळे जगातील तंत्रज्ञान आणि आरोग्य उद्योग ठप्प होतील का? MRI महाग होतील तर एआय चिप्स वर मोठे संकट

रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली

पुढील लेख
Show comments