Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

कोरोना:सावधगिरी न बाळगल्यास तिसऱ्या लाटेचा इशारा

कोरोना:सावधगिरी न बाळगल्यास तिसऱ्या लाटेचा इशारा
, रविवार, 4 जुलै 2021 (16:48 IST)
कोविड -19साथीच्या मॉडलिंगशी संबंधित सरकारी समितीच्या वैज्ञानिकांनी असे म्हटले आहे की जर आपण कोरोना मार्गदर्शक सूचनांचे योग्य पालन केले नाही तर कोरोना विषाणूची तिसरी लाट ऑक्टोबर- नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत शिखराची पातळी गाठू शकते, परंतु जास्त काळजी करण्याची गरज नाही, कारण कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटात नोंदविल्या जाणाऱ्या  रोजच्या घटनांपैकी अर्धे प्रकरण आढळण्याची शक्यता दिसून येत आहे.
 
'फॉर्म्युला मॉडेल 'किंवा कोविड-19 च्या गणितीय अंदाजावर काम करणारे मनिंद्र अग्रवाल यांनी असेही म्हटले आहे की जर विषाणूचे एक नवीन रूप तयार झाले तर तिसरी लहर वेगाने पसरू शकते, परंतु ती दुसर्‍या लहरी पेक्षा अर्ध वेगवान असेल.
 
अग्रवाल म्हणाले की, डेल्टा फॉर्म एका वेगळ्या प्रकारची लागण झालेल्या लोकांना संक्रमित करीत आहे.म्हणून हे लक्षात ठेवले आहे.'ते म्हणाले,की जसे जसे लसीकरण मोहीम वेगवान होतील,तिसऱ्या किंवा चवथ्या लहरींची शक्यता कमी होईल.
 
भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने गेल्या वर्षी गणिताच्या मॉडेल्सचा वापर करून कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या बाबतीत होणाऱ्या वाढीचा अंदाज वर्तवण्यासाठी एक समिती गठित केली होती आणि या समितीत आयआयटी हैदराबादशिवाय आयआयटी कानपूरचे शास्त्रज्ञ मनिंद्र अग्रवाल यांचा समावेश होता.शास्त्रज्ञ एम विद्यासागर आणि एकात्मिक संरक्षण कर्मचारी (वैद्यकीय) चीफ लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर या देखील सहभागी आहे.
 
यापूर्वी या समितीने कोविडच्या दुसऱ्या लाटाचे नेमके स्वरुप माहिती नसल्याबद्दल कोणत्याही टीकेला सामोरे जावे लागले होते.मनिंद्र अग्रवाल म्हणाले की, तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवताना, प्रतिकारशक्ती कमी होणे, लसीकरणातील परिणाम आणि आणखी धोकादायक स्वरूपाची शक्यता वर्तविली जात होती, जी दुसर्‍या लहरीच्या मॉडलिंग दरम्यान झाली नव्हती. या संदर्भात ते म्हणाले की लवकरच याबाबतचा सविस्तर अहवाल प्रसिद्ध केला जाईल.
 
ते म्हणाले ,की 'आम्ही तीन परिदृश्य तयार केले आहेत.एक म्हणजे 'आशावादी'. यामध्ये, आम्ही गृहित धरतो की ऑगस्टपर्यंत जीवन सामान्य होईल आणि विषाणूचे नवीन रूप येणार नाही.
 
दुसरे आहे 'मध्यवर्ती 'या मध्ये आमचा असा विश्वास आहे की आशावादी परिदृश्य गृहीत धरण्यापेक्षा 20 टक्के कमी प्रभावी आहे.
 
दुसर्‍या ट्वीटमध्ये अग्रवाल म्हणाले, 'तिसरा म्हणजे' निराशावादी '.हे मध्यवर्ती पेक्षा वेगळे आहे.ऑगस्ट मध्ये एक नवीन 25 टक्के अधिक संसर्गजन्य रूप पसरू शकतो.(हे डेल्टा प्लस नाही, आणि डेल्टा पेक्षा देखील अधिक संक्रामक नाही).अग्रवाल यांनी शेअर केलेल्या आलेखानुसार,ऑगस्टच्या मध्य पर्यंत दुसरी लाट स्थिर होण्याची शक्यता आहे,आणि तिसरी लाट ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान शिगेला पोहोचू शकते.
 
शास्त्रज्ञ म्हणाले की,'निराशावादी' परिस्थिती निर्माण झाल्यास, तिसर्‍या लाटेत, देशातील प्रकरणांची संख्या दररोज 1,50,000 ते 2,00,000 च्या दरम्यान वाढू शकते.ते म्हणाले की, ही आकडेवारी  मेच्या पहिल्या सहामाहीत दुसर्‍या लाटेच्या शिखरावर असलेल्या रुग्णांच्या आकडेवारींपैकी अर्ध्या संख्येची आहे, जेव्हा रूग्णालयात रुग्ण भरले आणि हजारो लोक मरण पावले होते.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शिवसेना-भाजपमध्ये काही शिजत आहे? संजय राऊत भाजप नेत्याला भेटल्यानंतर म्हणाले