Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोरोना अपडेट : राज्यभरात २ लाख ०१ हजार ७०३ रुग्णांवर उपचार सुरू

Corona update
, गुरूवार, 3 सप्टेंबर 2020 (08:20 IST)
राज्यात १३ हजार ९५९ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत एकूण ५ लाख ९८ हजार ४९६ रुग्ण बरे झाले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.४८ टक्के आहे. बुधवारी  १७ हजार ४३३ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्यभरात आतापर्यंत सध्या २ लाख ०१ हजार ७०३ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.
 
आतापर्यंत पाठविण्यात आलेल्या ४२ लाख ८४ हजार नमुन्यांपैकी ८ लाख २५ हजार ७३९ नमुने पॉझिटिव्ह (१९.२७ टक्के) आले आहेत. राज्यात १४ लाख ०४ हजार २१३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३६ हजार ७८५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात बुधवारी २९२ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.५ टक्के एवढा आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अरे देवा, ही तर हद्दच झाली, 'या' जिल्ह्यात कोरोना देवीचे मंदिर? कोंबडे, बोकडांचा नैवेद्य