मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली होती. त्यामुळे नागरिकांना कोरोनापासून दिलासा मिळाला होता.आता पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे.आज मुंबईत दिवसभरात 867 नवे कोरोना रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे . मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना रुग्णसंख्येत झालेली वाढ नागरिकांसाठी चिंतेची बाब बनली आहे.सध्या मुंबईत एकूण 4624 सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 1107419 वर पोहोचली आहे. तर कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांचा दर 97.9% एवढा झाला आहे. तसेच कोरोना दुप्पटीचा दर 1372 दिवसांवर पोहोचला आहे. दिलासादायक बातमी म्हणजे आज कोरोनामुळे एकाचाही मृत्यू झाला नाही.