Dharma Sangrah
✕

कोरोना अपडेट : राज्यात रविवारी सर्वाधिक रुग्ण घरी सोडले

Webdunia
सोमवार, 21 सप्टेंबर 2020 (08:43 IST)
राज्यात सलग दुसऱ्या दिवशी रविवारी २३ हजार ५०१ एवढ्या विक्रमी संख्येने रुग्ण बरे होऊन घरी  सोडण्यात आले असून ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. नवीन निदान झालेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक असून रविवारी २१ हजार ९०७ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्यभरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ८ लाख ५७ हजार ९३३ पोहोचली आहे. राज्यभरातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या देखील कमी झाली आहे. सध्या २ लाख ९७ हजार ४८० रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.
 
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५७ लाख ८६ हजार १४७ नमुन्यांपैकी ११ लाख ८८ हजार १५ नमुने पॉझिटिव्ह ( २०.५३ टक्के) आले आहेत. राज्यात १८ लाख  ०१ हजार १८० लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३९ हजार ८३१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ४२५ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.७१ टक्के एवढा आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

नवीन

भारताचे तीन 'अ' संघ जाहीर, अनुष्का शर्मा टी-२० आणि एकदिवसीय संघांचे नेतृत्व करणार

मदर डेअरीनंतर अमूलनेही दुधाच्या दरात वाढ केली आहे; प्रति लिटर ₹४ ने महाग झाले

सांगलीत ऊसाच्या शेतात विजेच्या तारेचा धक्का लागून न्यायाधीशांचा दुर्दैवी मृत्यू

पुण्याचे नाव बदलून 'फुले नगर' करण्याची मागणी, राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाने मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे प्रस्ताव सादर केला

स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ मध्ये नवी मुंबई देशातील सर्वात स्वच्छ शहर ठरले

पुढील लेख
Show comments