suvichar

आता बोला, कोरोनावर २०२१ पूर्वी लस नाही

Webdunia
सोमवार, 6 जुलै 2020 (08:08 IST)
कोविड १९ वर एकूण ११ प्रायोगिक लशींवर सध्या जगात चाचण्या सुरू आहेत. त्यात भारतातील कोव्हॅक्सीन व झायकोव्ह डी या लशींचा समावेश आहे. पण, यातील कुठलीही लस २०२१ पूर्वी उपलब्ध होऊ शकणार नाही, असे विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाने रविवारी म्हटले आहे.
 
आयसीएमआरने (भारतीय वैद्यक संशोधन परिषद) मात्र शुक्रवारी असे म्हटले होते की, पंधरा ऑगस्ट रोजी करोनावरची स्वदेशी लस जारी केली जाईल. आयसीएमआरच्या त्या घोषणेवर टीकेची झोड उठल्यानंतर लशीच्या चाचण्यांत स्वयंसेवक ठरवणे व इतर प्रक्रियातील लालफितीचा कारभार टाळण्यासाठी रुग्णालये, कंपन्या व इतर संबंधित घटकांना १५ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली होती, असे स्पष्टीकरण या संस्थेने केले होते. असे असले तरी पंधरा ऑगस्टला स्वदेशी लस आणली जाईल या घोषणेवर त्यांनी स्पष्टपणे माघार घेतली नव्हती, पण रविवारी विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयाने मात्र अशी लस निदान या वर्षी तरी उपलब्ध होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
 
पंतप्रधान मोदी यांना विरोधकांवर राजकीय मात करण्याकरिता पंधरा ऑगस्टचा मुहूर्त साधून करोना लस जारी करता यावी यासाठी हा खटाटोप असल्याची टीका वैद्यकीय तज्ज्ञांनी केली होती. बिहारमध्ये यावर्षी निवडणुका आहेत त्यामुळेच मतदारांवर प्रभाव टाकण्याचा हा डाव असल्याची टीका करण्यात आली होती. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

नवीन

LIVE: अण्णा हजारे यांनी ५ जुलैपासून आमरण उपोषणाचा आग्रह धरला

उद्धव ठाकरेंना आणखी एक झटका! संसदेत पक्षाचे कार्यालय काढून घेण्यात येऊ शकते

IRE vs IND: माजी क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीला प्लेइंग 11 मधून वगळले

Olympics: ऑलिम्पिक 2036 चे यजमानपद 2029 मध्ये जाहीर होणार, आयओसीने हा बदल केला

संभाजीनगरमध्ये २ वर्षांच्या मुलाला तब्बल १५ मिनिटे मारहाण; बालवाडीच्या मालक आणि मुख्याध्यापकांविरुद्ध FIR दाखल

पुढील लेख
Show comments