Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोरोनाची लस सरकारला महागात पडेल, जाणून घ्या कोव्हीशील्ड आणि कोवॅक्सीनची नवीन किंमत काय आहे

Corona vaccine will cost the government dearly
, शनिवार, 17 जुलै 2021 (15:30 IST)
नवी दिल्ली.केंद्राने यावर्षी ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत कोव्हीशील्ड आणि कोवॅक्सीन लसांच्या 66 कोटी पेक्षा जास्त डोस अनुक्रमे 205 रुपये आणि 215 रुपये प्रति डोस (कर वगळता) सुधारित दराने खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत.
 
सूत्रांनी सांगितले की, डिसेंबरपर्यंत भारत सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून 37.5 कोटी आणि भारत बायोटेक कडून 28.5 कोटी डोस खरेदी केले जातील. ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत कोविड 19 लस - कोव्हीशील्ड आणि कोवॅक्सीन कर वगळता अनुक्रमे 205 रुपये आणि215 रुपये प्रति डोसने खरेदी केल्या जाणार. कोव्हीशील्ड ची किंमत प्रति डोस 215.25 रुपये आहे आणि कोवॅक्सीन कर समाविष्ट करुन प्रत्येक डोसवर 225.75 रुपये आहे.
 
केंद्रीय आरोग्य मंत्रालय दोन्ही लस प्रति डोस 150 रुपये दराने खरेदी करीत आहे. 21 जूनपासून नवीन कोविड -19 लस खरेदी धोरण लागू झाल्यानंतर किंमतींमध्ये सुधारणा करण्यात येण्याचे संकेत मंत्रालयाने दिले आहेत.नवीन धोरणांतर्गत मंत्रालय देशातील फार्मास्युटिकल कंपन्यांनी तयार केलेल्या लसांपैकी 75 टक्के लस खरेदी करणार.
 
सूत्रांनी सांगितले की, केंद्राने दोन्ही औषध कंपन्यांना उत्पादन क्षमता वाढवण्यास सांगितले आहे आणि लस उत्पादकांनी असेही सूचित केले आहे की उत्पादन वाढवण्यासाठी गुंतवणूकीच्या वेळी त्यांना दरमहा 150 रुपये मिळणे शक्य नाही.यापूर्वी केंद्र सरकारने राज्य आणि खासगी रुग्णालयांना या प्रक्रियेचे विकेंद्रीकरण केल्यावर 50 टक्के लस घेण्याची परवानगी दिली होती.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 जून रोजी लसीच्या मार्गदर्शक सूचनांचा आढावा घेण्याची घोषणा केली.घरगुती लस उत्पादकांना त्यांच्या मासिक उत्पादनापैकी 25 टक्के उत्पादन खाजगी रुग्णालयांना देण्याचा पर्याय देण्यात आला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नारायणगाव बायपासचं काम पूर्ण, पुणे-नाशिक प्रवास होणार सुस्साट