Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

कोरोनाव्हायरस जरी रिपोर्ट नकारात्मक आला ,तरी कोरोना असू शकतो

कोरोनाव्हायरस  जरी रिपोर्ट नकारात्मक आला ,तरी कोरोना असू शकतो
, मंगळवार, 16 मार्च 2021 (21:41 IST)
जर आपल्याला सर्दी,पडसं आणि ताप आहे, आणि आपल्याला हे वाटत आहे की हा कोरोना असू शकतो आणि आपण तपासणी करता. या नंतर आपला तपासणीचा अहवाल नकारात्मक आला आहे, अहवाल बघून आपल्याला वाटते की आपल्याला कोरोना नाही.परंतु असे समजू नका. हा भ्रम देखील असू शकतो. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार अहवाल नकारात्मक येऊन देखील आपण कोरोनाबाधित असू शकता.  
खरं तर ,बऱ्याच वेळा कोरोना चाचणीमध्ये आढळून येत नाही. त्याचे मुख्य कारण म्हणजे की आता या विषाणूच्या नवीन स्ट्रेन किंवा म्युटेशन ने आपले लक्षण बदलून दिले आहेत. म्हणून बऱ्याच वेळा हे चाचणीच्या वेळी आढळून येत नाही. म्हणून निश्चिन्त होऊन असे समजू नका की आपल्याला कोरोनाची लागण लागलेली नाही .

डॉ. समीर माहेश्वरी  'एमबीबीएस ' स्पष्ट करतात की या विषाणूचे नवीन म्युटेशन पूर्वी  पेक्षा अधिक संसर्गजन्य आहे आणि या  नवीन विषाणूंची लक्षणे देखील बदलून येत आहे. 
त्यांनी सांगितले की या पूर्वी सर्दी,खोकला, ताप, गंध कमी होणे,आणि चव नसणे सारखे लक्षणे असायचे, परंतु आता असे नाही त्यांनी सांगितले की आता सर्दी, खोकला,आणि तापासह अशक्तपणा आणि जुलाब होणे या सारखे लक्षणे देखील समाविष्ट आहे. अशा परिस्थितीत जर पारंपरिक पद्धतीने तपासणी केल्यावर समजत नाही की कोरोना आहे किंवा नाही. आणि तपासणीचा अहवाल नकारात्मक येतो.    

डॉ. सांगतात की अशा परीस्थितीत सर्दी खोकला सारखे लक्षणे असतील तर डॉक्टरांना दाखवावे  कोरोनाची तपासणी करवावी. या नंतर देखील तपासणीचा अहवाल नकारात्मक आला तर सीटी स्कॅन करा. 
डॉ. सांगतात की सिटी स्कॅन केल्याने हे स्पष्ट होईल की कोरोना आहे की नाही .परंतु सिर्टी स्कॅन डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच करवावे. 

डॉ.सांगतात की वारंवार सिटीस्कॅन करू नका. या मधून निघणारे रेडिएशन एक्स्पोजर घातक असतात. एकदा केल्या जाणाऱ्या सिटी स्कँन मधून जे रेडिएशन बाहेर पडतात ते 100 एक्स रे च्या प्रमाणे आहे. त्याचे रेडिएशन देखील धोकादायक असतात. या मुळे कर्क रोग होण्याचा धोका असू शकतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पॅन कार्डाला आधार कार्डशी लिंक कसे करावे जाणून घ्या