Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आता हापूस आंबे आणि मासे राज्यभरात उपलब्ध होणार

Webdunia
शुक्रवार, 27 मार्च 2020 (16:51 IST)
कोरोना रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनमध्ये सुद्धा नागरिकांना आता हापूस आंबे आणि मासे राज्यभरात उपलब्ध होतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. गुढीपाडव्यापासून हापूसचा हंगाम सुरु होतो. पण लॉकडाऊनमुळे हापूस आणण्यात अडचणी होत्या.
 
राज्य सरकारनं याची दखल घेऊन आंबा आणि मासे वाहतुकीला अडचण येणार नाही याची खबरदारी घेतली आहे. याबाबत अजित पवार म्हणाले, कोकणातील आंबे राज्याच्या कोणत्याही भागात विक्रीसाठी पाठवले जाऊ शकतात. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळातही मुंबईसह महाराष्ट्रात हापूस उपलब्ध होऊ शकेल आणि लोकांना घरबसल्या हापूसची चव चाखता येईल. पुण्यातील भाजी, फळं आणि मासळीबाजार आज किंवा उद्या सकाळपासून सुरु होईल, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.
 
राज्य सरकारनं मासे विक्रीलाही परवानगी दिली आहे. राज्यात कुठल्याही बाजारात मासे विक्री केली जाऊ शकते, त्यात अडचण येणार नाही, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

नवीन

मुंबई उच्च न्यायालयाने एफडीए वर ५ लाख रुपयांचा दंड ठोठावला

LIVE: मुंबई उच्च न्यायालयाने एफडीए वर ५ लाख रुपयांचा दंड ठोठावला

गणेशोत्सवापूर्वी खड्डेमुक्त महाराष्ट्रासाठी मोठी तयारी; सरकारचा खास प्लॅन

हेमंत सोरेन यांच्या निर्णयानंतर झारखंडमधील विद्यार्थी आंदोलन संपले, पण सीबीआय चौकशीचा विद्यार्थ्यांचा आग्रह

महाराष्ट्रात आजपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी नवा नियम; नेमकं काय बदललं?

पुढील लेख
Show comments