जगभरात वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. शनिवारी आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले की, चीन, जपान, हाँगकाँग, बँकॉक आणि दक्षिण कोरियामधून भारतात येणाऱ्या लोकांसाठी आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य असेल. याबाबत लवकरच सविस्तर आदेश काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मांडविया म्हणाले, आम्ही या मुद्द्यावर विमान वाहतूक मंत्रालयाशी बोलत आहोत. ज्या प्रवाशांचा RT-PCR रिपोर्ट पॉझिटिव्ह येईल किंवा ज्यांना तापासारखी लक्षणे आढळतील त्यांना क्वारंटाईन केले जाईल.
चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग आणि थायलंड येथून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी विमान वाहतूक मंत्रालयाचा आदेश जारी करण्यात आला आहे. याअंतर्गत सध्याची आरोग्य स्थिती जाहीर करण्यासाठी हवाई सुविधा फॉर्म भरणे बंधनकारक करण्यात आले आहे.