Marathi Biodata Maker

होय, सदोष आरटी पीसीआर किट्स वितरित झाले : टोपे

Webdunia
बुधवार, 14 ऑक्टोबर 2020 (08:23 IST)
राज्यात कोरोना चाचणीसाठी सदोष आरटी पीसीआर किट्स वितरित झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या कबुलीमुळे खळबळ माजली आहे. करोना संसर्गाची तपासणी करण्यात येणाऱ्या आरटी पीसीआरच्या १२ लाख ५० हजार किट्स सदोष आढळल्या असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. ते जालनात बोलत होते.
 
“राज्य सरकारने खरेदी केलेल्या GCC Biotech Ltd कंपनीच्या किट्स सदोष असल्याचा रिपोर्ट एनआयव्हीने दिला,” असल्याचं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. “वैद्यकीय संचालनालयाकडून किट्सची खरेदी करण्यात येत असून GCC Biotech ltd या कंपनीच्या किट्सचा वापर तातडीने थांबवण्यात आला आहे. तसंच सदोष किट्सचा पुरवठा करणाऱ्या या कंपनीवर कारवाई करणार,” असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. “जिथे किट्सचं वाटप झालं आहे तेथील निकाल चुकीचे येण्यापेक्षा ते थांबवून तात्पुरतं एनआयव्हीने त्यांच्या किट्स उपलब्ध करुन द्यायचा असा निर्णय झाला आहे. जेणेकरुन टेस्टिंग थांबू नये. एनआयव्हीकडून सगळ्या टेस्ट केल्या जातील,” अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

सर्व पहा

नवीन

१५ लाख रुपयांचे दागिने भंगार म्हणून विकले, चार महिन्यांनी विक्रेत्याला परत करुन मन जिंकले

सुप्रिया सुळे यांनी रोहित पवारांना झेड प्लस सुरक्षेची मागणी केली

LIVE: भिवंडीमध्ये भाजपच्या नऊ नगरसेवकांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

अजित पवार विमान अपघातात 27 फेब्रुवारीपूर्वी प्राथमिक चौकशी अहवाल जाहीर होणार

23 वर्षांचा प्रवास संपवून अमृता फडणवीस यांनी अ‍ॅक्सिस बँकेतून राजीनामा दिला

पुढील लेख
Show comments