Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

राज्यात १ हजार ४१८ नवीन रुग्णांचे निदान

राज्यात १ हजार ४१८ नवीन रुग्णांचे निदान
, शुक्रवार, 29 ऑक्टोबर 2021 (09:02 IST)
राज्यात गुरुवारी २ हजार ११२ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६४ लाख ४५ हजार ४५४ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.५४ टक्के एवढे झाले आहे. राज्यातील करोना संसर्गाची दुसरी लाट आता ओसरल्यात जमा आहे. कारण, दररोज आढणाऱ्या करोनाबाधितांच्या संख्येत घट होत असून, करोनामधून बरे होणाऱ्यांची संख्या देखील वाढताना दिसत आहे. 
 
राज्यात १ हजार ४१८ नवीन रुग्णांचे निदान झाले. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६६ लाख ०७ हजार ९५४ झाली आहे. राज्यात एकूण  १८ हजार ७४८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर ३६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे. 
 
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,२३,१६,९१० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,०७,९५४ (१०.६२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ७१ हजार २०० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ८९६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यपाल म्हणाले…ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी पंतप्रधान मोदींना रस्ता दाखविला