Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात 1078 नवीन कोरोना रुग्णांचे निदान

Webdunia
बुधवार, 3 नोव्हेंबर 2021 (08:57 IST)
राज्यातील कोरोना बाधित  रुग्णांच्या संख्येत चढ-उतार पहायला मिळत आहे. सोमवारी (दि.1) राज्यातील कोरोनाची आकडेवारी  हजाराच्या आली असताना आता  यामध्ये वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. तर मंगळवारी  राज्यात 10 रुग्णांच्या मृत्यूची (Death) नोंद झाली होती. मात्र,यामध्ये मोठी वाढ झाली आहे. रुग्ण वाढत असताना बरे (Recover) होण्याचे प्रमाण वाढल्याने अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (active patient) संख्या 15 हजारावर आली आहे. त्यामुळे दिलासा मिळाला आहे. राज्यात  1078 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर 1095 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
 
राज्यात आतापर्यंत 64 लाख 53 लाख 581 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) 97.59 टक्के आहे.
तसेच आज दिवसभरात 48 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत राज्यात 1 लाख 40 हजार 274 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
 
त्यामुळे राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.12 टक्के इतका झाला आहे. सध्या राज्यात (Coronavirus in Maharashtra) 15 हजार 485 रुग्णांवर उपचार सुरु (Active patient) आहेत. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 28 लाख 43 हजार 792 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 66 लाख 12 लाख 965 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 1 लाख 91 हजार 497 लोक होम क्वारंटाईन (home quarantine) आहेत तर 919 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (institutional quarantine) आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

'बटंगे तो कटेंगेचा नारा इथे चालणार नाही- अजित पवारांचे प्रत्युत्तर

PAK vs AUS: पाकिस्तानने शेवटची वनडे आठ गडी राखून जिंकली,ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव

पोटनिवडणुकीपूर्वी हिंसाचार उसळला, भाजप-काँग्रेस समर्थकांचा गोळीबार

ग्रेटर नोएडा एक्सप्रेसवेवर भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू

आमदार अशोक पवार यांच्या मुलाचा आपलं अपहरण झाल्याचा दावा

पुढील लेख
Show comments