Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

काय प्रत्येक 15 मिनिटात पाणी पिण्याने कोरोना व्हायरसचा संसर्ग होणार नाही.. जाणून घ्या सत्य...

drinking water in every 15 mins
, बुधवार, 11 मार्च 2020 (15:52 IST)
जगभरात कोरोना व्हायरसमुळे लोकं घाबरलेले आहेत. सोशल मीडियावर याहून बचावासाठी अनेक उपचार व्हायरल होत आहे. अशात एक दावा केला जात आहे की कोरोना व्हायरसच्या संसर्गापासून बचावासाठी व्यक्तीचा घसा नेहमी ओलसर असावा. आणि यासाठी प्रत्येक 15 मिनिटाने पाणी पिणे फायदेशीर ठरेल. 
 
काय आहे व्हायरल- 
व्हायरल पोस्टामध्ये लिहिले आहे की- “COVID-19 रुग्णांवर उपचार करणार्‍या जपानी डॉक्टरांचा आवश्यक सल्ला. सर्वांना हे सुनिश्चित करावे लागेल की आपलं तोंड आणि घसा ओलसर असावा, घशात कोरड पडू नये याची काळजी घ्यावी. प्रत्येक 15 मिनिटाला किमान एक घोट पाणी पीत राहावं. अशात व्हायरस आपल्या तोंडात पोहचलं असल्यास तरळ पदार्थामुळे पोटात निघून जाईल आणि पोटात अॅसिड व्हायरसला नष्ट करेल. आणि आपण नियमित पुरेसं पाणी पीत नसाल तर व्हायरस आपल्या विंडपाइप आणि नंतर फुफ्फुसात प्रवेश करू शकतो. हे अत्यंत धोकादायक आहे.
drinking water in every 15 mins
काय आहे सत्य-
व्हायरस पोस्ट भ्रामक असल्याचे आढळून येतं. WHO ने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटहून ट्विट करत हा दावा नाकारला आहे की हायड्रेटेड राहणे संपूर्ण आरोग्यासाठी आवश्यक आहे, परंतू याने कोरोना व्हायरसचा संसर्ग होणार नाही याची खात्री घेता येत नाही.


 
डब्ल्यूएचओने व्हिडिओद्वारे कोरोनो व्हायरस संसर्गापासून बचावासाठी उपाय सांगितले आहेत.


 
जपानच्या आरोग्य, कामगार आणि कल्याण मंत्रालयाने देखील कोरोना व्हायरसपासून बचावासाठी सतत पाणी पिण्याचा सल्ला देणारा सल्ला दिलेला नाही.
 
वेबदुनिया तपासणीत आढळले की प्रत्येक 15 मिनिटात पाणी पिण्याने कोरोना व्हायरसपासून बचाव होण्याचा दावा फेक आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ज्योतिरादित्य सिंधिया यांचा भाजपा पक्षप्रवेश