Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोरोनाची तिसरी लाट ऑक्टोबरमध्ये येण्याची भीती, वेगवेगळ्या संस्थांचा इशारा

Fear of a third wave of corona coming in October
, सोमवार, 23 ऑगस्ट 2021 (22:36 IST)
"आपणच 'निमंत्रण' देत असू तर कोरोनाची लाट येईल," असा इशारा केंद्र सरकारच्या बायोटेक्नॉलॉजी विभागाच्या सचिव डॉ. रेणू स्वरुप यांनी दिला आहे.
 
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना त्या म्हणाल्या, "आपल्याला या विषाणूचं स्वरुप माहिती आहे. त्यावर आपलं नियंत्रण नाही. जेवढ्या जास्त लोकांना कोरोनाची लागण होईल तेवढ्याच संख्येने त्याचा संसर्ग होतो. कोरोनापासून बचावासाठी लागू केलेले नियम पाळणं मात्र आपल्या हातात आहे. सुरक्षित अंतर ठेवणे, स्वच्छता राखणे, मास्क घालणे, इत्यादी."
 
नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास तिसरी लाट टाळता येऊ शकते असंही डॉ. स्वरुप यांनी स्पष्ट केलं. पण साथीच्या रोगाचे तज्ज्ञ आणि जाणकारांनी संभाव्य तिसरी लाट येण्याबाबत काळजी व्यक्त केली आहे. 
आपण कोरोना प्रतिबंधक उपाय आणि नियमावलीचे पालन केले तर कोरोनाचा संसर्ग एकापासून दुसऱ्या व्यक्तीकडे जाणार नाही असंही डॉ. स्वरुप म्हणाल्या.l
राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापनाने केंद्रीय गृह विभाभांतर्गत पंतप्रधान कार्यालयाकडे यासंदर्भात नुकताच एक अहवाल सादर केला. यात कोरोनाची तिसरी लाट ऑक्टोबर महिन्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
 
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी (23 ऑगस्ट) बोलताना स्पष्ट केलं की, नीती आयोगाकडून देण्यात आलेला सावधानतेचा इशारा आजचा नाही. केंद्राला आलेलं पत्र जून महिन्यातील आहे, असंही ते म्हणाले.
 
आताच्या परिस्थितीत केंद्र सरकारकडून कोणताही इशारा आलेला नाही. त्यामुळे घाबरुन जाण्याचे कारण नाही, असं राजेश टेपे म्हणाले आहेत.
 
दरम्यान, तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची पूर्वतयारी झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यात कलाकेंद्र, आठवडे बाजार आणि यात्रा लवकर सुरु करण्याबाबत शासन सकारात्मक