Festival Posters

रेमेडिसिव्हिर वापरण्याच्या इतर मार्गांचा शोध सुरु, इनहेलरवर संशोधन

Webdunia
बुधवार, 3 जून 2020 (17:22 IST)
रेमेडिसिव्हिर औषध कोरोना विषाणूच्या उपचारात सर्वात प्रभावी मानलं जातं. रुग्णांवर त्याचा परिणाम दिसून आल्यानंतर औषध बनवणारी कंपनी गिलियड हे औषध अधिक सहजतेने कसं घेता येईल यावर विचार करीत आहे. कंपनीने एक निवेदन जारी केलं आहे. रेमेडिसिव्हिर वापरण्याच्या इतर मार्गांचा शोध घेत आहोत, तसंच यासाठी इनहेलरवर संशोधन केलं जात आहे, असं कंपनीने निवेदनात म्हटलं आहे.
 
वॉल स्ट्रीट या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत कंपनीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी मरदाद पारसी यांनी कंपनीच्या योजनांबद्दल सांगितलं. ते म्हणाले की, आगामी काळात रेमेडिसिव्हिरच्या इंजेक्शनसह पावडर बनवण्याचं संशोधन सुरु आहे, ज्यामुळे ते औषध इनहेलरद्वारे घेता येईल. रेमेडिसिव्हिर गोळीच्या स्वरूपात दिलं जाऊ शकत नाही कारण त्याचे रासायनिक थर यकृताला हानी पोहचवतात. हे औषध फक्त इंट्राव्हेनस (आयव्ही) स्वरूपात रूग्णालयात दिलं जाऊ शकतं. गिलियड रेमेडिसिव्हिरच्या विद्यमान आयव्ही फॉर्म्युलेशनला कसं पातळ केलं जाऊ शकतं आणि नेब्युलायझरद्वारे कसं घेतलं जाऊ शकतं याचा अभ्यास करीत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

नवीन

MSRTC : महाराष्ट्र सरकारने राज्य रस्ते वाहतूक महामंडळाला ₹४०.३९ कोटींच्या आर्थिक मदतीची मंजुरी दिली

मुंबईत कार-ऑटोच्या धडकेने भीषण आग, कारमधील चालकाचा जळून मृत्यू

देशाचे नवे शिक्षण मंत्री कोण? धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीत हालचाली; देवेंद्र फडणवीसांचे नाव चर्चेत!

LIVE: सुरगाणा, नाशिक आणि डहाणू, पालघर येथे भूकंपाचे सलग चार धक्के जाणवले

नीट पेपरफुटी प्रकरणात नागपूर आणि संभाजीनगर येथे विशेष न्यायालये स्थापन होणार

पुढील लेख
Show comments