Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तबलिगी जमातने गुन्हा केला, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे

Tablighi community
, शनिवार, 2 मे 2020 (16:27 IST)
देशभरात करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होण्यासाठी तबलिगी जमात जबाबदार असल्याचा आरोप उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. तबलिगी जमातसाठी काम करणाऱ्या लोकांनी करोना विषाणूंचे वाहक म्हणून काम केल्याचं म्हटलं आहे. 
 
तबलिगी जमातने करोनाचा फैलाव केला नसता तर लॉकडाउनच्या पहिल्या टप्प्यातच आपण परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं असतं असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. तबलिगी जमातने गुन्हा केला असून त्याच पद्धतीने त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे असंही योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं आहे. योगी आदित्यनाथ यांनी यावेळी उत्तर प्रदेशात तबलिगी जमातशी संबंधित तीन हजार लोक सापडले असल्याचा दावा केला आहे.
 
“आजार होणे हा गुन्हा नाही. पण करोनासारखा आजार लपवून ठेवणे हा नक्कीच गुन्हा आहे. ज्यांनी कायद्याचं उल्लंघन केलं आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे,” अशी माहिती योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

‘मातोश्री’ बाहेरील सुरक्षा रक्षकाला कोरोना