Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

कोरोना संसर्गाच्या यादीत भारत सातव्या स्थानावर

कोरोना संसर्गाच्या यादीत भारत सातव्या स्थानावर
, सोमवार, 1 जून 2020 (16:20 IST)
एका दिवसांत सर्वाधिक कोरोनाबाधितांचा आकडा वाढल्याचे समोर आले आहे. त्यामुळे भारतात आता १ लाख ८२ हजार १४३ इतकी कोरोनाबाधितांची संख्या झाली आहे. तर ५ हजार १६४ जणांचा मृत्यू यामुळे झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार भारत हा कोरोना संसर्गाच्या यादीत सातव्या स्थानावर असल्याचे पाहायला मिळत होते. 
 
यापूर्वी भारत नवव्या स्थानावर होता.जॉन हॉपकिन्स कोरोना व्हायरस ट्रॅकरच्या आकडेवारीनुसार, भारतात १ लाख ८९ हजार ७६५ कोरोनाबाधित झाले असून जगभरात कोरोना संसर्ग यादीत तो सातव्या स्थानावर आला असल्याची नोंद आहे. तर इटली ही २ लाख ३३ हजार ०१९ आणि त्यानंतर फ्रान्स ही १ लाख ८८ हजार ७५२ कोरोनाबाधितांसह भारताच्या पुढे आहेत. दरम्यान, काल सायंकाळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांत ८ हजार ३८० नव्या कोरोनाबाधितांचा समावेश झाल्याचे सांगितले जात आहे.
 
देशात ८९ हजार ९९५ अॅक्टीव्ह केसेस आहेत. तर ८६ हजार ९८३ जण आतापर्यंत कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. तर एक रुग्ण बरा होऊन देशाबाहेर गेला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीमध्ये, आतापर्यंत साधारण ४७.७६ टक्के रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. तर गेल्या २४ तासांत ४ हजार ६१४ रुग्ण बरे झाले आहेत. देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात असून राज्यात काल २ हजार ४८७ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

प्रसिद्ध होमिओपॅथी डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू