Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यात पाच हजारांपेक्षा कमी रूग्णांची नोंद, ॲक्टिव्ह रुग्णसंख्या 55,454

Less than five thousand patients were registered in the state
, शनिवार, 21 ऑगस्ट 2021 (08:32 IST)
महाराष्ट्रात कोरोना संसर्गाचा वेग मंदावत असून, मागील काही दिवसांपासून नव्याने वाढ होणा-या रूग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. राज्यात शुक्रवारी 4 हजार 365 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. राज्यात सध्या 55 हजार 454 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 64 लाख 15 हजार 935 एवढी झाली आहे. त्यापैकी 62 लाख 21 हजार 305 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात 6 हजार 384 बरे झालेल्या कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

राज्यात आज 105 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजवर 1 लाख 35 हजार 672 रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.11 टक्के एवढा झाला आहे. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 96.97 टक्के एवढा झाला आहे.

राज्यात आतापर्यंत 5 कोटी 19 लाख 21 हजार 798 नमूने तपासण्यात आले आहेत.सध्या राज्यात 3 लाख 22 हजार 221 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 2 हजार 745  जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लाचखोरी प्रकरणातील दोषींवर कारवाई करणार – चंद्रकांत पाटील