उत्तर प्रदेशात वाढत्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन पुन्हा लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशमध्ये शुक्रवार रात्री १० वाजल्यापासून ते १३ जुलै पहाटे ५ वाजेपर्यंत हा लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. या लॉकडाऊन दरम्यान रुग्णालये आणि आवश्यक वस्तूंची दुकाने सुरू असणार आहेत.
उत्तर प्रदेशमधील वाढत्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी मुख्य सचिव राजेंद्र तिवारी यांनी लॉकडाऊनचे जारी करणाचा आदेश दिला आहे. या लॉकडाऊन वेळी सर्व शहरी आणि ग्रामीण भागातील बाजारपेठ, कार्यालये वगैरे बंद राहतील. तथापि या दरम्यान आवश्यक सेवांवर कोणतेही बंधन घालण्यात येणार नाहीत.
या लॉकडाऊनला उद्या रात्री १० वाजता सुरुवात होणार असून १३ जुलै पहाटे ५ वाजेपर्यंत असणार आहे. लॉकडाऊन दरम्यान मालवाहतुकीवर कोणतेही बंधन नाही आहे. राष्ट्रीय आणि राज्य मार्गांवर वाहनांची हालचाल सुरुच राहणार आहे. पूर्वीप्रमाणे रेल्वेची देखील वाहतूक सुरुच राहणार आहे.