Marathi Biodata Maker

महाराष्ट्रात लॉकडाउन, मध्यरात्रीपासून राज्यात कलम 144 लागू, जाणून घ्या घोषणा

Webdunia
रविवार, 22 मार्च 2020 (16:33 IST)
करोना विषाणूचा वाढता फैलाव आणि त्यातून सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळत असल्याने राज्य सरकारकडून मोठा निर्णय घेतला गेला आहे. आज मध्यरात्रीपासून राज्यातील नागरी भागात कलम 144 लागू करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊनची घोषणा केली गेली आहे. 
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की आज 9 वाजेपर्यंत जनता कर्फ्यू आहे. पण हा संयम असाच कायम ठेवायचा आहे. म्हणून रात्री ९ वाजल्यानतंर बाहेर पडू नका. तसेच दोन दिवसांपासून रुग्णांची संख्या वाढत असून ही संख्या आपल्याला थांबवायची आहे. हे लक्षात घेता उद्या सकाळपासून राज्यातील संपूर्ण नागरी भागात 144 कलम लावण्यात येत आहे. 
 
या दरम्यान मुख्यमंत्र्यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या-
रेल्वे, खासगी बसेस, एस टी बसेस बंद
मध्यरात्रीपासून सर्व जगातून येणारी विमाने बंद 
जीवनावश्यक आणि अत्यावश्यक कारणांसाठीच शहरांतर्गत बस सेवा सुरु राहील 
अन्न धान्य, भाजीपाला, औषधे ही दुकाने सुरूच राहतील
बँका, वित्तीय संस्था सुरूच राहतील
शासकीय कार्यालयात आता केवळ ५ टक्के कर्मचारीच उपस्थित राहतील
सर्व प्रार्थनास्थळ भाविकांसाठी बंद
चाचणी केंद्रे वाढवणार
अन्न धान्यांचा साठा करू नका
गेल्या 15 दिवसांमध्ये विदेशातून आलेल्यांनी समाजात फिरू नये 
 
करोनाचा विषाणू गुणाकार पद्धतीनं वाढतो त्यामुळे गरज भासल्यास लॉकडाऊन 31 मार्च नंतर वाढवण्याचे संकेतही उद्धव ठाकरे यांनी दिले. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

नवीन

भारताचे माजी कर्णधार रोहित शर्माला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले जाणार

LIVE: शरद पवार गटाच्या नेत्या सक्षणा सलगर यांचा विरोधी पक्षांवर जोरदार हल्ला

बीडमध्ये बोटीच्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला; क्षमतेपेक्षा जास्त भार हे अपघाताचे कारण

CNG कार खरेदी करणे खरंच फायद्याचे आहे का? जाणून घ्या संपूर्ण गणित

फिफा विश्वचषक इतिहासातील सर्वात मोठी स्पर्धा, भारतात सामने किती वाजता पाहता येणार

पुढील लेख
Show comments