Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

राज्यात १६,४२९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद

राज्यात १६,४२९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद
, मंगळवार, 8 सप्टेंबर 2020 (10:13 IST)
राज्यात सोमवारी १६,४२९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर उपचार सुरु असलेल्या ४२३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ९,२३,६४१ इतका झाला आहे. यापैकी २,३६,९३४ रुग्णांवर अजूनही उपचार सुरु आहेत. तर कोरोनामुळे आतापर्यंत राज्यातील २७०२७ जणांनी आपले प्राण गमावले आहेत. 
 
सोमवारी दिवसभरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण पुणे जिल्ह्यात मिळाले. गेल्या २४ तासांत याठिकाणी २०५३ नव्या रुग्णांची नोंद झाल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १,०७, ९५८ झाला आहे. यापैकी पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारी १,२६९ करोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर मुंबईत कोरोनाचे १७८८ नवे रुग्ण मिळाले. तर ३१ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणांसमोरील आव्हान आणखी बिकट झाले आहे. 
 
दरम्यान, सोमवारी दिवसभरात राज्यात कोरोनातून बरे झालेले १४,९२२ रुग्ण घरी परतले. त्यामुळे कोरोनावर यशस्वी मात केलेल्या लोकांचा राज्यातील आकडा ६,५९,३२२ इतका झाला आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.३८ टक्के इतके झाले आहे. सध्याच्या घडीला राज्यात १५,१७,०६६ व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर ३८,३४९ व्यक्ती या संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यात कोरोना टेस्टचे नवे दर निश्चित, टेस्टचे नवे दर १,२०० रुपये