मुंबईमध्ये शहरी भाग असल्याने संसर्ग वेगाने होत आहे. सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी करोनाने बाधित होत आहेत. अतिरिक्त पोलिस आयुक्त, पोलिस उपायुक्त तसेच इतर पोलिस यांना करोनाची लागण झपाट्याने होत आहे. अनेक अधिकाऱ्यांना ताप, सर्दी, खोकला जाणवत असल्याने अधिकारी आजारी सुट्टीवर गेल्यामुळे अनेक अधिकाऱ्यांची जबाबदारी दुसऱ्या अधिकाऱ्यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. त्यामुळे पोलिस अधिकाऱ्यांनी करोना प्रचंड धसका घेतला आहे.
गेल्या दोन वर्षांपासून करोनाविरुद्धच्या लढ्यात जिवाची बाजी लावून काम करणाऱ्या पोलिसांनाही करोनाची लागण होऊ लागली आहे. एका दिवसांत १०० पोलिस कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याची घटना ताजी असतानाच,सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तर ठाणे जिल्ह्यातील ३९२ पोलिसांनाही बाधा झाली आहे. त्यामुळे पोलिस दलाची चिंता अधिकच वाढली आहे.