Daily Horoscope
✕

मुंबईत नाकावाटे लसीकरणाला प्रारंभ

Webdunia
गुरूवार, 27 एप्रिल 2023 (21:26 IST)
मुंबईत पुन्हा एकदा डोके वर काढणाऱ्या कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेतर्फे मुंबईकरांना 24 लसीकरण केंद्रांवर आता नाकावाटे घ्‍यावयाच्‍या इन्‍कोव्‍हॅक लस देण्यात येणार आहे. या कोरोना-19 प्रतिबंधक लसीकरणाला 28 एप्रिलपासून प्रारंभ करण्यात येणार आहे. मात्र 60 वर्षे वयावरील पात्र नागरिकांना, त्यांनी कोविशिल्ड अथवा ची दुसरी मात्रा घेतल्यानंतर सहा महिन्यांनी इन्‍कोव्‍हॅक लसीची प्रतिबंधात्मक मात्रा देण्यात येणार आहे.
कोवॅक्सिन
मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांच्या आदेशाने, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्‍त (सार्वजनिक आरोग्‍य) संजय कुऱ्हाडे हे स्वतः लक्ष घालून कोरोनाला रोखण्यासाठी आवश्यक लसीकरण व अन्य उपाययोजना संबंधित अधिकाऱ्यांमार्फत मार्गी लावत आहेत. आतापर्यंत 2 कोटी 21 लाख 96 हजार 995 नागरिकांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
 
मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात 16 जानेवारी 2021 पासून कोरोना-19 प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम सुरु झाली होती. प्रारंभी प्राधान्य गटांचे व त्यानंतर 1 मे 2021 पासून 18 वर्षे वयावरील सर्व नागरिकांचे कोरोना लसीकरण करण्यात आले होते. कोरोना-19 लसीची प्रतिबंधात्मक मात्रा (प्रिकॉशन/बूस्टर डोस) 10 जानेवारी 2022 पासून देण्यात येत आहेत. 26 एप्रिल अखेरपर्यंत 2 कोटी 21 लाख 96 हजार 995 नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीची पहिली, दुसरी आणि प्रतिबंधात्मक मात्रा देण्यात आली आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

नवीन

देवीच्या पूजेसाठी नऊ दिवस छातीवर कलश धारण केल्यानंतर दहाव्या दिवशी महिलेचा मृत्यू; डॉक्टरांनी मृत्यूचे कारण उघड केले

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान

शेतकाऱ्यांसाठी उत्तम आणि फायदेशीर उत्पन्न देणारा पर्याय; मोसंबीची लागवड

एकाच ओळखपत्रावर तुम्ही किती सिम कार्ड खरेदी करू शकता? सरकारचा नवीन नियम वाचा

LIVE: महाराष्ट्र सरकारचा कडून नौदलात प्रशिक्षित २८२ अग्निवीरांना पोलीस कॉन्स्टेबल पदांवर थेट नियुक्तीची मंजुरी

पुढील लेख
Show comments