Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नरेंद्र मोदी- कोरोनाची सध्याची स्थिती पाहाता देशात लॉकडाऊनची गरज नाही

Narendra Modi: Given the current situation of Corona
, शुक्रवार, 14 जानेवारी 2022 (11:15 IST)
कोरोनाची सध्याची परिस्थिती लक्षात घेता देशात लॉकडाऊन लागणार नाही, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे.
 
अर्थात, अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर आणण्यासाठी स्थानिक पातळीवर कंटेन्मेंट झोन तयार करुन कोरोनाला आळा घालण्याची आवश्यकता असल्याचंही त्यांनी म्हटलं.
 
कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांनी 30 राज्यांतील मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली. या चर्चेनंतर पंतप्रधानांनी जनतेशी संवाद साधला.
 
कोरोनाच्या चाचण्या वाढवण्याची सूचना पंतप्रधानांनी राज्यांना दिली आहे.
 
"होम आयसोलेशनमध्ये जास्तीत जास्त उपचार होणं शक्य आहे. त्यामुळे होम आयसोलेशन संबंधी नियमांचे पालन करावं," असं पंतप्रधानांनी म्हटलं.
 
ट्रॅकिंग आणि ट्रिटमेंट योग्य पद्धतीने केल्यास रुग्णालयात जाण्याची आवश्यकता नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
 
पंतप्रधान मोदींनी दुपारी साडेचारच्या सुमारास सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला.
 
19 राज्यांमध्ये 10 हजारहून अधिक ओमायक्रॉन करोना रुग्ण असून महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली, तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश, केरळ आणि गुजरात या राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी बुधवारी दिली होती.
 
भारतात गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाच्या 2,47,417 नव्या केसेस समोर आल्या आहेत. गेल्या एका दिवसाच्या तुलनेत ही 27 टक्क्यांची वाढ आहे. एका दिवसात देशात कोरोनामुळे 380 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, गेल्या 24 तासात 84,825 जण या आजारातून बरे देखील झाले आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

...तर भाजपच्या 'त्या' 12 आमदारांचं निलंबन रद्द होऊ शकतं