Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुस्लीम आहे म्हणून सामान स्वीकारले नाही, नकार देणाऱ्या व्यक्तीला अटक

मुस्लीम आहे म्हणून सामान स्वीकारले नाही, नकार देणाऱ्या व्यक्तीला अटक
, गुरूवार, 23 एप्रिल 2020 (16:35 IST)
मुंबईतील मीरा रोड येथील कर्मचारी  मुस्लिम असल्याचं कारण सांगत, सामान स्वीकारण्यास नकार देणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे. बरकत पटेल असं या कर्मचाऱ्याचं नाव असून तो मिरा रोडमधील स्थानिक दुकानात सामान घरपोच पोहचवण्याचं काम करतो. सामान स्वीकारण्यास नकार देणाऱ्या व्यक्तीचं नाव गजानन चतुर्वेदी असं असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
 
या घटनेमध्ये, सकाळी बरकत पटेलला ९ ठिकाणी सामान पोहचवायचं होतं. जया पार्क परिसरात राहणाऱ्या सुप्रिया चतुर्वेदी यांच्याकडे सकाळी ९ वाजून ४० मिनीटांच्या दरम्यान सामान पोहचवण्यासाठी गेला होता. नियमांप्रमाणे बरकत सोसायटीच्या गेटबाहेर चतुर्वेदी यांना सामान देत होता, इतक्यातच सुप्रिया यांचे वडील गजानन यांनी आपल्या मुलीला सामान घेण्यापासून थांबवलं. बरकतने या प्रकरणाचा व्हिडीओ पोलिसांना दिला आहे. मी आतापर्यंत ज्या-ज्या घरांमध्ये गेलो आहे लोकांनी मला आपुलकी दाखवली आहे. सध्याच्या खडतर काळात आम्ही बाहेर का पडतोय याची अनेकांना जाणीव आहे, मात्र असे प्रकार त्रासदायक असतात, असं बरकत पटेलने म्हटलं आहे.

या व्हिडीओनुसार आरोपीने सर्वात प्रथम बरकतला त्याचं नाव विचारलं. सुप्रिया या सामान स्वीकारण्यास तयार होत्या, तरीही गजानन यांनी आम्ही मुस्लीम व्यक्तीकडून सामान स्वीकारणार नाही असं सांगितलं. “मी त्या क्षणी काहीही बोललो नाही, घडलेला प्रकार मी मोबाईलमध्ये शूट केला आणि पोलिसांना सोपवला, पण माझ्यासाठी हा प्रसंग अपमानास्पद होता.” बरकतने आपली बाजू मांडली. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, हॉटेल व्यवसाय सुरु करण्याची केली मागणी