सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र दिसून येत आहे,या लागण पासून आता मुके प्राणी देखील वाचत नाही, अशा परिस्थितीत कोरोनाने प्राण्यांचे जीव घेण्यास सुरुवात केली आहे.देशातील पहिल्या प्राणाचा मृत्यू आज कोरोनामुळे झाल्याचे वृत्त समोर आले आहे.ही घटना आज तामिळनाडू येथील अरिगनर अण्णा प्राणीसंग्रहलाय मध्ये घडली असून नऊ सिंहांना कोरोनाची लागण लागली असून त्यापैकी आज एक सिंहाचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी संध्याकाळी 6:15 वाजता या सिंहाचा मृत्यू झाला आहे.त्याच्या वर उपचार सुरु होते.त्याला सुरुवातीला कोरोनाची लक्षणे दिसतातच त्यांची चाचणी करण्यात आली त्या चाचणीत त्या सिंहांना कोरोनाची लागण लागल्याचे निष्पन्न झाले.
मे महिन्यात या सिंहाची देखरेख करणारे प्राणीसंग्रहालयातील सफारी पार्कमध्ये पशुवैद्यकीय पथकाला सिंहांना भूक न लागणे,नाकातून पाणी येणं कफ होणे या सारखे लक्षणे आढळून आले होते.प्राणी संग्रहालयातील 11 सिंहांचे नमुने तपासणीसाठी पाठविले त्यात नऊ सिंह कोरोना बाधित आढळले.त्यापैकी आज एक सिंहाचा मृत्यू झाला आहे.
या प्राणी संग्रहालयातील 25 कामगारांना देखील कोरोनाची लागण लागण्याचे कळाले आहे.
या पूर्वी गेल्या वर्षी एप्रिलमध्ये न्यूयॉर्कमधील प्राणीसंग्रहालयात सिंहाला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं त्यानंतर हाँगकाँगमध्ये मांजरी आणि कुत्र्यांनाही या व्हायरसची लागण झाल्याची माहिती समोर आली होती.
भारतात प्राण्यांसह घडणारी ही प्रथमच घटना सांगितली जात आहे.