Publish Date: Fri, 10 Apr 2020 (15:44 IST)
Updated Date: Fri, 10 Apr 2020 (15:47 IST)
कोरोना व्हायरसमुळे गेल्या दोन आठवड्यात क्रीडा क्षेत्रातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी इटलीत एका ऑलिम्पिकपटूचा मृत्यू झाला. इटलीचे धावपटू दोनातो साबिया यांचे निधन झाले. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. ते 56 वर्षांचे होते.
धक्कादायक म्हणजे काही दिवसांपूर्वी दोनातो यांच्या वडिलांचे कोरोनामुळेच निधन झाले होते. दोनातो यांनी 1984च्या लॉस एंजलिस ऑलिम्पिकमध्ये 5 वे तर 1988 च्या सोल ऑलिम्पिक स्पर्धेत सातवे स्थान मिळवले होते.