Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ओमिक्रॉन कोरोनाः केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार कोरोना पॉझिटिव्ह

Webdunia
गुरूवार, 6 जानेवारी 2022 (22:40 IST)
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याची माहिती पवार यांनी ट्वीटरवरुन दिली आहे.
त्याबरोबरच महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनीही आपल्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट केले आहे.
ट्वीटरवर चाकणकर लिहितात, "सौम्य लक्षणे जाणवल्यामुळे कोरोनाची चाचणी केली असता माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी लक्षणे जाणवल्यास कोरोना चाचणी करून घ्यावी. लवकरच मी आपल्या सर्वांच्या सेवेत पुन्हा रुजू होईन."
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी ट्वीट करून यासंदर्भात माहिती दिली.
माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सौम्य स्वरुपाची लक्षणं आहेत. मी घरी आयसोलेट केलं आहे. गेल्या काही दिवसात जे माझ्या संपर्कात आले असतील त्यांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी असं आवाहन केजरीवाल यांनी केलं आहे.
 
दिल्लीत कोरोनाचे आकडे झपाट्याने वाढत आहेत. गेल्या 24 तासात दिल्लीत कोरोनाचे 4099 नवे रुग्ण आढळले होते. पॉझिटिव्हिटी रेट 6.46 टक्के इतका झाला आहे.
 
दिल्लीत काही दिवसांपूर्वीच यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, सलग दोन दिवस पॉझिटिव्हिटी रेट 5टक्क्यांपेक्षा जास्त राहिला तर रेड अलर्ट घोषित केला जाऊ शकतो. याअंतर्गत शहरात कठोर निर्बंध लागू होऊ शकतात.
 
नगरविकासमंत्री आणि ठाणे-गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कोरोनाची लागण झाल्याचे ट्वीटरवर जाहीर केले आहे.
प्रसिद्ध मालिका निर्मात्या आणि बालाजी टेलिफिल्म्सच्या सर्वेसर्वा एकता कपूर यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवरून याबाबत माहिती दिली.
 
संपर्कात आलेल्या लोकांनी आपापली चाचणी करून घ्यावी, असं आवाहनही एकता कपूर यांनी केलंय.
 
तसंच, अभिनेता जॉन अब्राहम आणि त्याची पत्नी प्रिया या दोघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. या दोघांनाही कोरोनाची सौम्य लक्षणं आहेत.
 
महाराष्ट्रातल्या या 8 नेत्यांना कोरोना संसर्ग
कोरोनाचा प्रसार पुन्हा एकदा वेगानं वाढताना दिसतोय. त्यात महाराष्ट्रातल्या अनेक राजकीय नेत्यांना कोरोनानं गाठलंय. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनाही कोव्हिड झाला आहे.
ज्या नेत्यांना कोरोनाची लागण झालीय, त्यांनी ट्विटरवरून आपापल्या सोशल मीडिया हँडल्सवरून याबाबत माहिती दिलीय.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिकमध्ये माहिती दिली की, महाराष्ट्रातील 10 मंत्री आणि 20 हून अधिक आमदारांना कोरोनाची लागण झालीय.
मात्र, नेमक्या कोणत्या मंत्र्यांना कोरोनाची लागण झालीय, हे त्यांनी सांगितलं नाही. मात्र, काही मंत्र्यांनी स्वत:हून सोशल मीडियाच्या माध्यमातून लागण झाल्याची माहिती दिली.
 
बाळासाहेब थोरात
महाराष्ट्राचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ट्विटरवरून माहिती दिली की, "माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. मला कोणतीही लक्षणं नाहीत, तरीही डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेणार आहे."
"माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. सगळ्यांना या निमित्ताने आवाहन करत आहे, आपण मास्क वापरावा, काळजी घ्यावी," असं थोरातांनी म्हटलंय.
 
पंकजा मुंडे
भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांना ओमिक्रॉन व्हेरियंटची लागण झालीय.
 
पंकजा मुंडेंनी ट्विटरवरून सांगितलं की, "कोरोनाबाधित लोकांच्या संपर्कात आल्याचे जाणवल्याबरोबर मी विलग झाले आहे. चाचणी केली. लक्षणं आणि कोरोना दोन्ही आहेत."
सर्वांनी काळजी घ्यावी, अशी विनंतीही पंकजा मुंडे यांनी केलीय.
 
सुप्रिया सुळे
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे या दोघांनाही कोरोनाची लागण झालीय.
 
सुप्रिया सुळेंनी ट्विटरवरून माहिती दिली की, "कोरोनाबाधित लोकांच्या संपर्कात आल्याचे जाणवल्या बरोबर मी विलग मी आणि सदानंद, आम्हा दोघांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे."
यावेळी सुप्रिया सुळेंनी काळजी करण्याचं कारण नसल्याचंही सांगितलं.
 
मात्र, त्याचवेळी त्या म्हणाल्या की, "आमच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करुन घ्यावी, ही नम्र विनंती. काळजी घ्या."
 
राधाकृष्ण विखे पाटील
भाजप नेते आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना कोरोनाची लागण झालीय. त्यांनीच याबाबत माहिती दिली.
विखे पाटलांनी नियोजित कार्यक्रम रद्द केले असून, त्यांनी कार्यक्रमांचं आयोजन करणाऱ्यांची माफीही मागितलीय.
 
यशोमती ठाकूर
महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनाही कोरोनाची लागण झाली असून, त्यांना कोणतीच लक्षणं नाहीत.
संपर्कात आलेल्यांनी आपली चाचणी करून घ्यावी, असं आवाहन यशोमती ठाकूर यांनी केलंय.
 
के. सी. पडवी
काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री के. सी. पडवी यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
 
वर्षा गायकवाड
महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनाही कोरोनाची लागण झालीय.
वर्षा गायकवाड यांना सौम्य लक्षणं आहेत. त्यांनी स्वत:ला विलगीकरण करून घेतलं असून, सर्वांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय.
 
प्राजक्त तनपुरे
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना कोरोनाची लागण झालीय.
प्राजक्त तनपुरेंनी त्यांच्या संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय.
 
यासह अनेक आमदारांनाही कोरोनाची लागण झालीय.
इंद्रनील नाईक, चंद्रकांत निंबा पाटील (मुक्ताईनगरचे आमदार), समीर मेघे आणि माधुरी मिसाळ या आमदारांनाही कोरोनाची लागण झालीय.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

मणिपूरमध्ये सीआरपीएफची मोठी कारवाई,चकमकीत 11 अतिरेकी ठार

मुंबईत प्लास्टिकच्या पिशवीत तुकड्यात मृतदेह आढळले

राहुल गांधी खोटे बोलत असल्याचा भाजपचा आरोप, कारवाई करण्याची मागणी

निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासली उद्धव ठाकरेंची बॅग, मोदींची तपासणार का म्हणाले

शाळेतून घरी परतताना मधमाशीच्या हल्ल्यात चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू

पुढील लेख