Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ओमिक्रॉन आता दिल्लीत शिरला,दिल्लीत ओमिक्रॉन चा पहिला रुग्ण आढळला

Omicron has now entered Delhi
, रविवार, 5 डिसेंबर 2021 (12:04 IST)
दिल्लीत कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन प्रकाराचा पहिला रुग्ण आढळून आला आहे .लोकनायक जय प्रकाश (LNJP) रुग्णालयात दाखल असलेला हा 37 वर्षीय रुग्ण नुकताच तंझानियाहून परतला होता. सध्या त्याला कोणतीही गंभीर लक्षणे दिसत नाहीत.
दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी रविवारी सांगितले की, दिल्लीत पहिला ओमिक्रॉनचा रुग्ण आढळला आहे. आतापर्यंत कोविड पॉझिटिव्ह आढळलेल्या 17 लोकांना एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या ओमिक्रॉन संक्रमित रुग्णाला देखील एलएनजेपी रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. आम्ही त्या रुग्णाला वेगळ्या वॉर्डात आयसोलेट केले आहे.
जैन म्हणाले की, जे बाहेरून येत आहेत त्यांची कोविड चाचणी केली जात आहे. LNJP रुग्णालयात आतापर्यंत 17 पॉझिटिव्ह रुग्ण दाखल आहेत, 6 त्यांच्या संपर्कात आलेले आहेत. 12 लोकांचे जीनोम सिक्वेन्सिंग केले गेले आहे, त्यापैकी 1 ओमिक्रॉनचा रुग्ण असल्याचे दिसते. अंतिम अहवाल उद्या येईल. दिल्लीतील हे पहिलेच ओमिक्रॉन प्रकरण आहे, असे आपण म्हणू शकतो.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नागालँड: सुरक्षा दलाच्या गोळीबारात 13 नागरिकांचा मृत्यू, जवानांची वाहने पेटवली, SIT तपास करेल