Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोरोना उपाययोजनांसाठी निलंगेकरांकडून एक कोटी

One crore
लातूर , बुधवार, 1 एप्रिल 2020 (13:06 IST)
देशासह राज्यातही थैमान घालणार्यां कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी माजीमंत्री संभाजी पाटील- निलंगेकर यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून एक कोटी रुपयांचा निधी देण्याचे जाहीर केले.
 
सध्या राज्यात कोरोनाच्या विषाणूचा प्रादुर्भाव होत आहे. जिल्ह्यात प्रशासनावतीने आरोग्य विभाग विविध उपाय करीत आहे. या प्रक्रियेत आपलेही योगदान असावे, या उद्देशाने माजी मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी एक कोटी रुपये देण्याची घोषणा केली. यासंदर्भात निलंगेकर यांनी जिल्हाधिकार्यांयना पत्र दिले आहे.
 
या निधीतून उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रात व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध करावी, असे त्यांनी जिल्हाधिकार्यांगना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. या निधीतून कुठे व कसा खर्च केला जाईल, याची सविस्तर रूपरेषा आपणास सादर करावी, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
 
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन व प्रशासन प्रयत्न करीत आहे. लोकप्रतिनिधी त्यात अग्रेसर आहेत. संभाजी पाटील - निलंगेकर यांनी एक कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली. हा निधी जिल्ह्यात सर्वाधिक आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

क्रिकेटपटू स्मृती मंधाना होमक्वारंटाइनमध्ये