Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रुग्ण वाढ कायम, राज्यात 16,620 कोरोना रुग्णांची वाढ

Webdunia
सोमवार, 15 मार्च 2021 (07:59 IST)
राज्यात कोरोना रुग्ण वाढीचा वेग कायम असून, राज्यात रविवारी 16 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली. दिवसभरात 16 हजार 620 नव्या कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली तर, 50 रुग्णांचा मृत्यू झाला. आरोग्य विभागाच्या हावाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 23 लाख 14 हजार 413 एवढी झाली आहे. त्यापैकी 21 लाख 34 हजार 072 जण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात 8 हजार 861 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.
 
राज्यात सध्या 1 लाख 26 हजार 231 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात पुणे, नागपूर, ठाणे, मुंबई, औरंगाबाद या जिल्ह्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात दिवसभरात 50 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यत  52 हजार 861 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.31 टक्के एवढा आहे. तर, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.21 टक्के झाले आहे.
 
आतापर्यंत राज्यात 1 कोटी 75 लाख 16 हजार 885 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 23 लाख 14 हजार 413 सकारात्मक आले आहेत. राज्यात 5 लाख 83 हजार 413 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 5 हजार 493 संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्यावर मंत्री विजय शाह यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

महाराष्ट्र सरकारने शाळांना मार्गदर्शक तत्त्वे जारी केली,बाल सुरक्षा आणि जागरूकतेवर भर दिले

एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भाईंदरपाडा उड्डाणपुलाचे उद्घाटन

अनिल देशमुख यांनी बनावट शिक्षक भरतीवरून सरकारवर हल्लाबोल केला

अमित शहांनी फोडली शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस! संजय राऊत यांची पुन्हा अमित शहांवर टीका

पुढील लेख
Show comments