Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पीपीई किट देतो, खासगी दवाखाने सुरु करा

Webdunia
गुरूवार, 21 मे 2020 (16:43 IST)
कोरोनाविरुद्धचा लढा तीव्र करताना इतर आजारांकडे काहीसे दुर्लक्ष होत आहे. अनेकांना उपचार मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने खासगी दवाखाने सुरु करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, अनेक ठिकाणी खासगी दवाखाने अजुनही बंद आहेत. खासगी दवाखाने बंद ठेवले तर कारवाई करण्यात येईल असा इशाराही राज्य सरकारने दिला आहे. आता पुन्हा एकदा खासगी दवाखाने सुरु करा, असे आवाहन करताना खासगी डॉक्टरांना पीपीई किट देण्यात येईल, असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
 
खासगी डॉक्टरांनी रुग्ण तपासण्यासाठी आपले दवाखाने सुरु करावेत, असे अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आवाहन केले आहे. पीपीई किट आणि एन ९५ मास्क याचा आवश्यक पुरवठा करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील किमान दहा केमिस्टच्या दुकानांमधून पीपीई किट आणि एन ९५ मास्क विक्रीस ठेवण्याची मान्यता देण्यात आली आहे. कोरोना या आजारा व्यतिरिक्त इतर रुग्ण तपासण्यासाठी खासगी दवाखाने सुरु ठेऊन रुग्ण सेवा करावी, असेही डॉ. शिंगणे यावेळी सांगितले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

नवीन

बारामती विमानतळावर उड्डाणापूर्वीच प्रशिक्षण विमान कोसळले

अहमदाबादमध्ये खोकल्याच्या औषधांचे एक मोठे रॅकेट उघडकीस आले; एसओजी गुन्हे शाखेने ६० लाख रुपयांचा माल जप्त केला

LIVE: बीडमध्ये तेलाची अवैध पुनर्पॅकिंग करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

एफडीएची मोठी कारवाई: बीडमध्ये तेलाची अवैध पुनर्पॅकिंग करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

जनरेशन झेड' ही एक अशी शक्ती आहे, ज्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, माजी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले

पुढील लेख
Show comments