पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी (११ एप्रिल रोजी) देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेतली होती. त्यानंतर राज्यातील लॉकडानचा कालावधी ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. आता पंतप्रधान नरेंद्र मोदीही देशव्यापी लॉकडाउनचा कालावधी वाढवण्यासंदर्भात काही घोषणा करतात का याकडे साऱ्या देशाचे लक्ष लागून राहिलेले आहे.Prime Minister @narendramodi will address the nation at 10 AM on 14th April 2020.
— PMO India (@PMOIndia) April 13, 2020