Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

कोरोनानंतर 'या' आजाराचा धोका

corona monkey
वायनाड , गुरूवार, 10 फेब्रुवारी 2022 (16:01 IST)
केरळच्या वायनाडमधील थिरुनेल्ली ग्रामपंचायतीच्या पानवेली आदिवासी भागातील २४ वर्षीय व्यक्तीला कसनूर वन रोग झाल्याचे निदान झाले आहे. स्थानिक भाषेत या आजाराला माकड ताप म्हणतात. आरोग्य अधिकार्‍यांनी याआधी मोसमी आजारांसाठी अलर्ट जारी केला होता आणि स्थानिक लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले होते. केरळमध्ये या आजाराचे पहिलेच प्रकरण समोर आले आहे. वायनाड जिल्ह्यात बंदर बुखारचा एक रुग्ण आढळला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली.
 
या तरुणाला मानंतवाडी आरोग्य महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. केरळमधील बंदर बुखारची ही पहिलीच घटना आहे. या विषाणूचे वर्गीकरण Flaviviridae म्हणून केले जाते. हा रोग माकडांच्या माध्यमातून माणसांमध्ये पसरतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आम्ही किंगमेकर कशाला आम्हाला तर किंग बनायचे : बाळा नांदगावकर