नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऍलर्जी आणि संसर्गजन्य रोगांचे शास्त्रज्ञ अँथनी फौसी यांनी ओमिक्रॉन प्रकारांपासून संरक्षण करण्याचे 6 सोपे मार्ग सांगितले आहेत. चला जाणून घेऊया कोणते सात मार्ग, ज्याच्या मदतीने तुम्ही ओमिक्रॉन प्रकारांपासून स्वत:चं संरक्षण करू शकता.
1. संक्रमाणाची लक्षणे दिसल्यास कोरोना टेस्ट करुन घ्या - टेस्ट केल्यामुळे तुम्हा लवकरात लवकर त्यावर उपचार सुरू करता येईल, तसेच हा लोकांमध्ये पसरणार देखील नाही.
2. मास्कचा वापर करा - मास्कचा वापर करणे सगळ्यांसाठी बंधनकारक आहे आणि त्याचे सगळ्यांनी पालन करा, ज्यामुळे आपण या रोगाला हरवू शकतो.
3. गर्दीपासून लांब राहा- शक्यतो गर्दीत जाणं टाळा, गरज असेल तरच गर्दीच्या ठिकाणी जा, कारण यामुळे संसर्गाचा धोका जास्त आहे.
4. सोशल डिस्टेंसिंगच्या नियमांचे पालन करा
5. कोविड लस घ्या- कोरोनाची दोन्ही ही लस लावून घ्या. ज्यामुळे याचा प्रभाव कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
6. कोविडची लक्षणे आढल्यास स्वत:ला सगळ्यांपासून लांब ठेवा.