Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोव्हीशिल्ड लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांची नोंदणी पूर्ण

Webdunia
शुक्रवार, 13 नोव्हेंबर 2020 (09:08 IST)
कोव्हीशिल्ड लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांची नोंदणी पूर्ण झाल्याची माहिती सिरम इन्स्टिटय़ुट ऑफ इंडियाकडून देण्यात आली आहे. याबाबत सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियातर्फे प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबत माहिती देण्यात आली आहे. सिरम आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेतर्फे (आयसीएमआर) देशातील १५ केंद्रांवर कोव्हीशिल्ड लशीच्या चाचण्या करण्यात येत आहेत. भविष्यात कोव्होव्हॅक्स या अमेरिकास्थित नोव्हाव्हॅक्सच्या वैद्यकीय विकसनासाठी सिरम आणि आयसीएमआर एकत्र आले आहेत. कोव्हीशिल्ड लशीचे डोस ज्या स्वयंसेवकांना देण्यात आले आहेत, त्यांच्यामध्ये कोणतेही गंभीर दुष्परिणाम (साईड इफे क्ट) दिसले नसल्यामुळे या चाचण्यांबाबत समाधानकारक असल्याची भावनाही सिरम आणि आयसीएमआरकडून व्यक्त करण्यात येत आहे.
 
सिरम इन्स्टिटय़ुटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला म्हणाले, करोना विषाणू संसर्गाविरुद्धच्या लढय़ामध्ये आयसीएमआरचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. करोना प्रतिबंधासाठी गुणकारी लस विकसित करण्याच्या मोहिमेत भारताला अग्रभागी ठेवण्यासाठी सिरम आणि आयसीएमआर यांच्यातील भागीदारीने महत्वाची भूमिका निभावल्याचेही पूनावाला यांनी स्पष्ट के ले. 
 
देशातील १५ केद्रांवर तब्बल १६०० स्वयंसेवकांना कोव्हिशिल्ड लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांमध्ये सहभागी करुन घेण्यात आले असून, त्यांपैकी बहुसंख्य स्वयंसेवकांना तिसऱ्या टप्प्यातील दुसरा डोसही टोचण्यात आल्या आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

सर्व पहा

नवीन

पहलगाम हल्ल्यातील बळींच्या कुटुंबियांना महाराष्ट्र सरकार 50 लाख रुपये देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले

समाजसुधारक गोपाळ कृष्ण गोखलेंनी सांगितला कर्तव्याचा खरा अर्थ, जाणून घ्या

मुंबई पोलिस शाळांचे सुरक्षा ऑडिट करणार

सातवीच्या एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये मोठा बदल

Maharashtra Day 2025 Wishes in Marathi महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

पुढील लेख
Show comments