rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

धनंजय मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण

Dhananjay Munde
महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनाही दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. याबाबतची माहिती त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली. ‘माझी आज दुसऱ्यांदा कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करून घ्यावी ही विनंती,’ असे धनंजय मुंडे त्यांच्या ट्विटमध्ये म्हणाले.

तसेच मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काळजी घेत आहे. काळजी करण्यासारखे काही नाही. सर्वांनी मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सचे पालन करावे व स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहनही धनंजय मुंडे यांनी त्यांच्या ट्विटच्या माध्यमातून केले आहे.

मुंडे यांना याआधी मागील वर्षी जूनमध्ये पहिल्यांदा कोरोनाची लागण झाली होती

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी यांना ‘कोरोना’चा संसर्ग