Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

किवळे भागात ब्लू व्हेल गेमच्या नादात इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या

Webdunia
सोमवार, 29 जुलै 2024 (18:40 IST)
सध्या लहान काय आणि मोठे काय मोबाईलच्या आहारी गेले आहे. लहान मुलांना देखील मोबाईल गेमचे व्यसन लागले आहे. त्यामुळे मुलांना काहीही सुचत नाही 

तसेच मोबाईलचा गेमच्या नादात येऊन अनेकांनी मृत्यूला कवटाळले आहे. अशी एक धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडच्या किवळे भागात घडली आहे. एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलाने इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, हा मुलगा गेल्या सहा महिन्यांपासून ब्लू व्हेल गेमच्या आहारी गेला होता. तो खेळाच्या नादात स्वतःला तासन्तास खोलीत कोंडायचा, एकटाच बडबड करायचा. आई वडिलांकडे चाकूची मागणी करायचा. हे सर्व पाहून आईवडिलांना त्याची काळजी वाटत होती. 

25 जुलै रोजी पावसामुळे शाळांना सुट्टी देण्यात आली होती. त्या दिवशी तो संपूर्ण दिवस गेम खेळत होता. रात्री त्याला जेवायला अनेकदा बोलावल्यावर जेवण करून तो पुन्हा खोलीत जाऊन बसला. त्याच्या लहान भावाला ताप आल्यामुळे आईवडील काळजीत होते. रात्री 1 वाजे पर्यंत त्याची आई त्याचा भावा जवळ बसली होती.

रात्री 1 वाजता त्याच्या आईच्या मोबाईलच्या व्हॅट्सऍपवर सोसायटीच्या ग्रुपवर एक मुलगा खाली पडून जखमी झाल्याचा मेसेज आला ती तातडीनं मुलाच्या खोलीच्या दिशेने गेली असता तिला मुलगा सापडला नाही. नंतर ती खाली पडलेल्या मुलाच्या जवळ गेली तर तो आपलाच मुलगा असल्याचे पाहून तिच्या त्याखालची जमीन सरकली. 

आपल्या मुलाला रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं पाहून त्या माउलीचे भान हरपले. मुलाला तातडीनं रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 

पोलिसांना माहिती मिळाल्यावर ते घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तपास केल्यावर त्यांना मुलाच्या खोलीतून एका कागदावर गेममधील कोडींगच्या भाषेत लिहिलेलं काही तरी आढळलं. मात्र ते काय लिहिले आहे ते समजलं नाही. त्याला नेमके काय म्हणायचं होत पोलीस त्याचा शोध लावत आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 
 
Edited By- Priya Dixit 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांची भेट घेतली

LIVE: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीनगरला पोहोचून पर्यटकांची भेट घेतली

SRH vs MI: अष्टपैलू कामगिरीमुळे मुंबई इंडियन्सचा विजय, पॉइंट टेबलमध्ये मोठा बदल; रोहितचे सलग दुसरे अर्धशतक

पहलगाम हल्ल्यासाठी अमित शाह जबाबदार', संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला

सिंधू जल करार काय आहे? भारताने करार थांबवल्याने लाखो पाकिस्तानी पाण्याच्या एक-एक थेंबासाठी आसुसतील!

पुढील लेख
Show comments