Daily Horoscope

रविवारी 3007 नवे कोरोना रुग्ण दाखल

Webdunia
सोमवार, 8 जून 2020 (09:44 IST)
राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येतील वाढ सतत वाढत असून रविवारी 3007 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर दिवसभरात 91 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एका दिवसांत 1924 रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात सध्या 43 हजार 511 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर एकूण कोरोनाबाधितांची संख्या 85 हजार 975 इतकी झाली आहे. 
 
राज्यात आतापर्यंत एकूण 39 हजार 314 कोरोनाग्रस्त बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. राज्यात आतापर्यंत 3060 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.देशातील सर्वाधिक कोरोनाबाधितांची संख्या एकट्या मुंबईत आहे. आज मुंबईत 1420 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. 
 
आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीतही कोरोनाचा वाढता संसर्ग चिंतेची बाब ठरत आहे. धारावीत 13 रुग्ण वाढले असून एकूण रुग्णसंख्या 1912वर पोहचली आहे. दादरमध्ये 24 नवे रुग्ण वाढले असून दादरमधील एकूण रुग्णसंख्या 408 झाली आहे. माहिममध्ये  13 नवे कोरोनाग्रस्त आढळले असून माहिममधील एकूण आकडा 637वर गेला आहे. मुंबईत एकूण 47 हजार 774 कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 21 हजार 190 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर 25 हजार 940 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर मुंबईत 1638 जण कोरोनामुळे दगावले आहेत.
 
ठाण्यात 13014, पालघर 1485, रायगड 1441, नाशिक 1521, जळगाव 1049, पुणे 9705, सोलापूर 1343, सातारा 630, सांगली 150, सिंधुदुर्ग 113, रत्नागिरी 354, औरंगाबादमध्ये 1965, नागपूरमध्ये 747 कोरोना रुग्ण आढळले आहेत.तर गडचिरोली 42, चंद्रपूर 32, गोंदिया 68, भंडारा 39, वर्धा 11, वाशिम 10, बीड 55, परभणी 78, बुलढाणा 87, यवतमाळमध्ये 160 कोरोनाबाधित सापडले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण सुधारलं असून रिकव्हरी रेट 45.72 टक्के इतका आहे. तर राज्यातील मृत्यू दर 3.55 टक्के आहे

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

भीषण अपघात अन् दरोडेखोरांचा पर्दाफाश! पोलिसांना पाहून पळणाऱ्या बनावट अधिकाऱ्यांच्या गाडीखाली तरुण चिरडला

सणासुदीच्या काळात १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

पंतप्रधान मोदींच्या ७६ व्या वाढदिवसनिमित्त सेवा संकल्प यात्रेला सुरुवात; अमित शाह आणि एकनाथ शिंदेनी हिरवा झेंडा दाखवला

मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू होणार

पुढील लेख