Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 63 लाख, 6,479 नवे रुग्ण

The number of corona patients in the state is 63 lakh
, सोमवार, 2 ऑगस्ट 2021 (08:05 IST)
राज्यात रविवारी  6 हजार 479 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, 157 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 63 लाख 10 हजार 194 एवढी झाली आहे.
 
आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील 60 लाख 94 हजार 896 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. 4 हजार110 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.राज्याचा रिकव्हरी रेट 96.59 टक्के एवढा झाला आहे.
 
राज्यातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत थोडी वाढ झाली असून, सध्या राज्यात सध्या 78 हजार 7962 सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.महाराष्ट्रात रविवारी 157 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजवर 1 लाख 32 हजार 948 रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.10 टक्के एवढा झाला आहे. राज्यात आतापर्यंत 4 कोटी 81 लाख 85 हजार 350 नमूने तपासण्यात आले आहेत. सध्या राज्यात 4 लाख 67 हजार 986 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 3 हजार 117 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लॉकडाऊन काळात विजेचा वापर 50 टक्क्यांनी घटला