भारतातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या ६००हुन अधिक रुग्ण कोरोना व्हायरसच्या विळख्यात आहे. त्यापैकी महाराष्ट्रात सर्वाधिक १२२ रुग्ण आहेत. तर तामिळनाडूत १८, आंध्रप्रदेशात १०, गोव्यात ३, पश्चिम बंगालमध्ये १० आणि बिहारमध्ये ६ कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत.
दरम्यान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कालपासून २१ दिवस संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे, गर्दी न करण्याचे आवाहन सरकारकडून सातत्याने करण्यात येत आहे.