Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

देशात मागील 5 दिवसांपासून कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या घटली

The number of new corona patients
, बुधवार, 19 ऑगस्ट 2020 (15:41 IST)
देशात मागील 5 दिवसांपासून कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या कमी होत आहे. सोबतच मृत्यूदरही कमी झाला आहे. आरोग्य मंत्रालयाकडून घेण्यात आलेल्या पत्रपरिषदेत आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी याबाबत सांगतिल.
 
यावेळी ते म्हणाले की, देशात संसर्गग्रस्तांची संख्या कमी होत आहे. देशात कोरोनाच्या पीक पॉईंटबद्दल काय परिस्थिती आहे, याबाबत बोलताना त्यांनी सांगितलं की, 'आम्ही अधिक मॅथेमॅटिकल मॉडेलवर विश्वास करत नाही. आमच्यासाठी कोरोनाचा पीक पॉईंट असं काहीही नाही. भारत सरकारचं संपूर्ण लक्ष कंटेन्मेंट, अधिक टेस्टिंग आणि उत्तम इलाज यावरच आहे.'
 
आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या महिन्याच्या 13 तारखेला 24 तासामध्ये 66,999 कोरोनाबाधित आढळले. त्यानंतर आता कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. 
- 14 ऑगस्टला 64,553  रुग्ण तर 1007 मृत्यू
-  15 ऑगस्ट 65,002 नवे रुग्ण, 996 मृत्यू
- 16 ऑगस्ट 63,490 नव्या रुग्णांची वाढ, तर 944 बळी
- 17 ऑगस्टला 57,981 नवे कोरोनाग्रस्त आढळे तर 941 दगावले 
- 18 ऑगस्टला दिवसभरात 55,079 नवे रुग्ण, 876 मृत्यू
 
दरम्यान, देशात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 27 लाख 2 हजार 742 इतकी झाली आहे. त्यापैकी 19 लाख 77 हजार 779 रुग्ण कोरोनातून बरे झाल्याची दिलासादायक बाब आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

थेट निर्णय ही अजितदादांची स्टाईल....!