Daily Horoscope
✕

राज्य सरकारने एक दमडीचंही पॅकेज दिलं नाही, राज्य सरकार अंग चोरून काम करतंय

Webdunia
शुक्रवार, 22 मे 2020 (15:35 IST)
भाजपाने ठाकरे सरकारविरोधात 'महाराष्ट्र वाचवा' आंदोलन केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगडने पॅकेज दिले, मात्र महाराष्ट्र सरकार केंद्राच्या पैशाव्यतिरिक्त एक नवा पैसा खर्च करायला तयार नाही, केंद्राने ४६८ कोटी दिले, याशिवाय १६०० कोटी रुपये मजुरांच्या स्थलांतरासाठी दिले. केंद्राने २० लाख कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर केलं, पण राज्य सरकारने एक दमडीचंही पॅकेज दिलं नाही, राज्य सरकार अंग चोरून काम करतंय, असं टीकास्त्रही फडणवीसांनी सोडलं आहे. 
 
राज्य सरकार आणि मंत्री आभासी जगात जगत आहेत, सोशल मीडियावर पेड गँग तयार करून आणि काहींना प्रवक्ता करून सरकारला लढाई जिंकू असं वाटतंय, पण ग्राऊंड लेव्हलला परिस्थिती वेगळी आहे, रुग्णांना उपचार मिळत नाहीत, रस्त्यावर फिरावं लागतं, सरकारी रुग्णालयात जागा नाही, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारवर घणाघाती टीका केली आहे. देशातील २० टक्के कोरोना रुग्ण महाराष्ट्रात असून राज्य सरकारची निष्क्रियता सातत्याने समोर येत असल्याची टीका माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

नवीन

सातारा अपघात झालेल्या प्रियकराच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने प्रेयसीचा वसतिगृहात मृत्यू

जयपूरमध्ये भीषण रस्ते अपघात, नाशिकचे ३ यात्रेकरू ठार, ७ जखमी

IND v NZ 2nd T20 : दुसऱ्या टी२० सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडला पराभूत केले

गिरीश महाजन यांनी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांना कुंभमेळ्यात ध्वजारोहण करण्यासाठी निमंत्रण दिले

महाराष्ट्रात ब्लिंकइटवर FDA ची मोठी कारवाई, ३३ लाख रुपयांचा मुदतबाह्य माल आढळल्याने युनिट निलंबित

पुढील लेख
Show comments